file photo

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील विविध ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांनी उघडलेल्या कोविड सेंटरची सत्य परिस्थिती जनतेच्या नजरेत आणून द्या. कोविड सेंटर खर्च, शासकीय सेवेतील डॉक्टरांची नेमणुका हे सर्व राज्य सरकारचा खर्च आहे,

याबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांना केले. सात्रळ, सोनगाव, धानोरे या गावांत विविध विकास कामाचे भूमिपूजन समारंभ खासदार विखेंच्या हस्ते व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी खासदार विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी अप्पासाहेब दिघे हे होते.

या प्रसंगी विखे कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, तहसीलदार शेख साहेब, धानोरे सोसायटी चेअरमन किरण दिघे, डॉ. पोपटराव दिघे, रंगनाथ भिकाजी दिघे, भाजपा चे तालुकाध्यक्ष अमोल भानगडे, जे. पी. जोर्वेकर, कारभारी ताठे पाटील,

वसंतराव डुकरे, रमेशराव पन्हाळे, बाबुराव पडघलमल, मछिंद्र दिघे, जयवंत दिघे,सुभाषराव अंत्रे, सात्रळ चे सरपंच सतीष ताठे, धानोरेचे सरपंच शामू माळी, उपसरपंच ज्ञानेश्वर दिघे, आर. बी. लांबे उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, स्व. खासदार बाळासाहेब विखे यांनी दाखवून दिलेल्या तत्वानुसारच गोर गरिबांची, सामान्य जनतेची कामे करणार आहे.

माजी आमदार कर्डिले यांनी परिसरातील केलेल्या विकास कामे, ज़िल्हा बँकेच्या माध्यमातून राहुरी साखर कारखाना चालू करण्यासाठीचे योगदान, कामगार संपाबाबतच्या भूमिकेचा उल्लेख केला.