अहमदनगर क्राईम

नेवासा तालुक्यात तलवारीचा धाक दाखवणाऱ्या गुंडांवर गुन्हा दाखल !

Published by
Ahmednagarlive24 Office

नेवासा तालुक्यातील तामसवाडी गावात तलवारीचा धाक दाखवणाऱ्यावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अविनाश आसाराम कापसे (रा. तामसवाडी) याने विशाल सावळेराम आयनर याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १२) संध्याकाळी ७.२० वाजेच्या सुमारास फिर्यादी अविनाश कापसे हे त्यांच्या राहात्या घरून गावामध्ये जात असताना तामसवाडी गावातील जय भवानी कृषी केंद्राजवळ आले होते.

त्यावेळी विशाल सावळेराम आयनर याने फिर्यादीस त्यांची मोटारसायकल आडवी लावून माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का दिली म्हणून शिवीगाळ केली व मोटारसायकलला लावलेली तलवार काढून तुला तलवारीनेच मारून टाकतो, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.

तेव्हा अविनाश कापसे यांनी या घटनेचा स्वतःच्या मोबाईलमध्ये काढलेला व्हिडीओ पोलिसांना दाखवला असता, या घटनेची पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दखल घेत, याबाबतची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

आरोपी विशाल आईनर यास पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अहिरे, पोलीस हवालदार कुसळकर, पोलीस कॉन्स्टेबल राजु ढाकणे यांचे पोलीस पथक तातडीने तामसवाडी येथे गेले असता, आरोपी विशालने तलवार तेथेच टाकून अंधारात धूम ठोकली. नेवासा पोलीस पथक आरोपीचा शोध घेत आहेत.

गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक काळोखे करीत आहेत. कायदा हातात घेऊन अशा प्रकारची भीती, दहशत कोणी निर्माण करेल, तर त्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिला आहे.

Ahmednagarlive24 Office