Ahmednagar News : अहमदनगर शहरात भर कापडबाजारात टोळीयुद्ध ! दांडक्याने मारहाण

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरामधील घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांबाबत वारंवार चिंता व्यक्त केली जात असताना आता नगर शहरातून एक मोठी बातमी हाती आली आहे. नगर शहरातील कापड बाजार जिल्ह्यात प्रसिद्ध.

या कापड बाजारातच एका हॉटेलसमोर आज (दि.१६ मे) भर दुपारी टोळीयुद्धाचा प्रकार घडला. एका तरुणाला चार ते पाच जणांनी दांडक्याने मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

तीन ते चार दिवसांपूर्वीच जाधव-मूर्तडक गटात हाणामारी होण्याची घटना घडली होती. जुन्या वादाची किनार या आजच्या घटनेला असल्याचे बोलले जात आहे. टोळी युद्धातून भर बाजारपेठेत तरुणाला दांडक्यांनी बेदम मारहाण झाली. प्रशांत काळे राहणार मंगलगेट असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तो या मारहाणीत गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती समजताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी तेलीखुंट परिसर, कापडाबाजार परिसर आदी ठिकाणी पाहणी केली. माहिती हाती आली तेव्हा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

शहरातील गुंडागर्दी चिंताजनक
मागील काही महिन्यांचा आढावा घेतला नगर शहरात वाढलेली गुंडागर्दी हा एक चिंतेचा विषय झाली आहे.भागानगरे खून प्रकरण असेल किंवा अगदी दोन दिवसापूर्वीचे शहरातील टोळीयुद्ध असेल यामुळे सामान्यवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

शहरातील सामान्य नागरिक या घटनेने भयग्रस्त असून पोलिसांनी ही गुंडागर्दी मोडीत काढावी अशी मागणी नागरिक करत आहेत. दरम्यान आज झालेल्या हाणामारीच्या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe