Ahmednagar News: 4 ऑक्टोबरला श्रीरामपूर राहता तालुक्याच्या सीमेवर नांदूर परिसरामध्ये पोलिसांना एक मृतदेह आढळून आला होता. तपासणी दरम्यान या मृतदेहावर काही जखमा होत्या व त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला होता. या मृतदेहाच्या खिशामध्ये पोलिसांना मोबाईल सापडला व त्यावरूनच मृतदेहाची ओळख पटवण्यामध्ये पोलिसांना यश आले होते.
ही मूर्त व्यक्ती नितेश आदिनाथ मैलारे नावाचा असून तो पोखंडेवाडी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
या प्रकरणांमध्ये पोलिसांनी राहता तालुक्यातील केलवड येथील ऋषिकेश देवन्ना बरबट या जीप चालकाला अटक केली असून त्यानेच छत्रपती संभाजी नगर येथून शिर्डी येथे जाण्यासाठी
सदर व्यक्तीला जीपमध्ये बसवले व प्रवासादरम्यान त्यांची चांगली ओळख झाल्यामुळे रस्त्यावर दोनदा ते दारू देखील प्यायले व नंतर श्रीरामपूर जवळ आल्या त्यांच्यात वाद होऊन वादातच हा खुनाचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
लिफ्ट दिली व सोबत दारू प्यायले आणि नंतर केला खून
छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डी येथे जाण्यासाठी एका जीपचालकाने नांदेड येथील व्यक्तीला लिफ्ट दिली. प्रवासादरम्यान चांगली ओळख झाल्याने दोघेही नेवासे परिसरात दोन वेळा दारू प्यायले. मात्र, श्रीरामपूरजवळ येताच त्यांच्यात वाद होऊन प्रकरण थेट खुनापर्यंत गेले.
पोलिसांनी प्रथमदर्शनी कोणत्याही पुराव्याशिवाय गुन्ह्याचा छडा लावत जीप चालकाला जेरबंद केले आहे.श्रीरामपूर राहाता तालुक्याच्या हद्दीवर नांदूर परिसरामध्ये ४ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान पोलिसांना एक मृतदेह सापडला होता. मृतदेहावर काही जखमेच्या खुणा होत्या.
पोलिसांना खिशातील मोबाइलवरून मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले होते. त्यावरून मयत व्यक्ती हा नितेश आदिनाथ मैलारे (वय २८, रा. पोखंडेवाडी, ता. मुखेड, जि.नांदेड) असल्याचे समजले. पोलिसांनी याप्रकरणी केलवड (ता. राहाता) येथील ऋषिकेश देवण्णा बरबट (वय २५) या जीप चालकाला अटक केली .
मयत नितेश मैलारे हा छत्रपती – संभाजीनगर येथून शिर्डीला जाण्यासाठी आलेला होता. तेथे तो वाहनांची वाट पाहत उभा होता. त्याच वेळी बरबट हा त्याच्या जीपमधून चालला होता. त्याने मैलारे याला आपल्या जीपमध्ये बसवले. दोघांमध्ये प्रवासामध्ये चांगली ओळख झाली. थांबवून ते दोन वेळा दारू पिले.
त्याच्यात मैत्रीचे संभाषण सुरू झाले. श्रीरामपूरजवळ येताच त्यांच्यात खटके उडाले. वादावादी सुरू झाली. गाडीतच त्यांच्यात भांडण झाले. श्रीरामपूर शहर ओलांडताच जीप चालक बरबट याने वाहनातील टॉमीने मैलारे याच्यावर वार केला. यात मैलारे हा गंभीर जखमी झाला. बरबट याने त्याला रिक्षातून ढकलून दिले.
त्यानंतर तो केलवड येथे घरी पोहोचला. आहे.नेवासे परिसरामध्ये रस्त्यात गाडी पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. मंगळवारी याबाबत पत्रकार परिषदेत सर्व माहिती देण्यात येणार आहे.