पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथील दुधसंकलन केंद्रासमोर शेतात ठेवलेले ट्रॅक्टरसोबतचे तिन यंत्र अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. लोखंडी तारेचे कुंपन तोडुन ही चोरी करण्यात आली आहे. ६५००० रुपयाचे अवजारे चोरी गेल्याची फिर्याद रामराव चव्हाण यांनी दिली आहे.
घुमटवाडी येथे शेततामध्ये दुधसंकलन केंद्राची जुनी इमारत आहे. तेथे तारेचे कुंपन केलेले आहे. समोरच रोटावेहेटर, सारायंत्र व पाळीयंत्र असे तिन ट्रॅक्टरचे अवजारे ठेवलेली होती. ७ डिसंबेर २०२३ च्या रात्री हे अवजारे कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेले आहेत.
रामराव चव्हाण यांनी शेतीसाठी हे अवजारे घेतले होते. रामराव चव्हाण व त्यांच्या पत्नी तारामती चव्हाण यांनी ७ डिसेंबर रोजी शेतामध्ये काम केले व सायंकाळी सात वाजता ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी ८ डिसेंबरला दुपारी बारा वाजता शेतामध्ये आले असता त्यांना अवजारे दिसले नाहीत.
व काटेरी कुंपनही तोडलेले दिसले. ६५००० रुपये किमतीचे तिन अवजारे चोरीला गेल्याची फिर्याद चव्हाण यांनी पोलिसात दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुदध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपास करीत आहेत.
तालुक्यात रोज चोरीच्या घटना घडत आहेत. चोरीच्या प्रकरणाचा तपास लागत नाही. रस्तालुट वाढली आहे. शहरात खिसेकापु व दागीने व मोबाईल चोर हातसाफ करीत आहेत.
पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यास गेले तर दुसरेच प्रश्न विचारुन नागरीकांना निरुत्तर केले जाते. मग तक्रार देणेच नको असे म्हणत नागरीक भिक नको पण कुत्रा आवर अशी गत होवुन निराश होतात.