file photo

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. नुकतेच संगमनेर खुर्द शिवारात मालट्रक व स्वीफ्ट कार यांच्यात झालेल्या धडकेत कारमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

कृष्णा सुभाष कर्पे (वय 28, रा. मेनरोड, संगमनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कृष्णा कर्पे याचा माऊली डेकोरटर नावाने व्यवसाय आहे. संगमनेर खुर्द शिवारातील कुबेर लॉन्स येथे गेला होता.

तो तेथून काम संपल्यानंतर कृष्णा कारने संगमनेरच्या दिशेने येत होता. दरम्यान संगमनेर खुर्द शिवारात शिवनेरी पतसंस्थेच्या वळणावर त्याचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने समोरून येणार्‍या मालट्रकवर कार जोरदार आदळली.

कारमधील कृष्णा कर्पे हा गंभीररित्या जखमी झाला होता. घटनास्थळावरील लोकांनी कृष्णास बाहेर काढत खासगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र अतिरक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. मयत झालेला तरुण शहरातील सर्वपरिचित व्यापारी सुभाष करपे यांचा मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील व तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.