Matheran Tourism : माथेरान मधील निसर्गसौंदर्याचा आनंद घ्या! पहा टॉय ट्रेनचे तिकीट दर आणि वेळापत्रक

Tejas B Shelar
Published:

Matheran Tourism : महाराष्ट्रमध्ये अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेली अशी पर्यटन स्थळे असून वर्षभराच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक अशा ठिकाणी भेटी देतात. साहजिकच पर्यटकांची गर्दी पाहता अशा पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणावर सोयी सुविधा उभारण्यासाठी शासनाकडून देखील प्रयत्न केले जातात.

महाराष्ट्राला तसे निसर्गाने भरभरून असे दिले असल्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटन स्थळांची कमी नाही. प्रत्येक पर्यटन स्थळांवर कमी अधिक प्रमाणात का असेना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने जर आपण पश्चिम महाराष्ट्रातील महाबळेश्वर तसेच पाचगणी व खंडाळा इत्यादी पर्यटन स्थळांचा विचार केला तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील व जगातील पर्यटक या स्थानांना भेटी देत असतात.

या ठिकाणी असलेले हिल स्टेशन हे पर्यटकांचे खास आकर्षण असून पुणे आणि मुंबईतील बरेच पर्यटक हे वीकेंड ट्रिप साठी या ठिकाणी येत असतात. या पर्यटन स्थळा सोबतच रायगड जिल्ह्यात माथेरान हे जे काही हिल स्टेशन आहे ते देखील निसर्ग सौंदर्याने खूप नटलेले असून या ठिकाणी देखील पर्यटकांना खूप मोठ्या प्रमाणावर आनंद घेता येतो.

याच माथेरान संबंधी जर आपण टॉय ट्रेन सेवेचा विचार केला तर माथेरान या पर्यटन स्थळाच्या दृष्टिकोनातून टॉय ट्रेन एक आत्मा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याच टॉय ट्रेनच्या बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आलेली आहे.

माथेरान मधील टॉय ट्रेन पुन्हा सुरू
रायगड जिल्ह्यातील माथेरान हिल स्टेशन हे प्रसिद्ध अशा हिल स्टेशन पैकी एक असून या ठिकाणी अतिशय धोकादायक वळण असल्यामुळे वाहनांना रस्ते मार्गाने परवानगी नाही. त्यामुळे या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांना टॉय ट्रेनने प्रवास करावा लागतो. प्रवासादरम्यान ही ट्रेन उंचच उंच पर्वतरांगांवरून अत्यंत अवघड आणि बिकट वाटेवरून जात असते.

परंतु पावसाळ्यामध्ये प्रवाशांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून ही ट्रेन चार महिने बंद ठेवण्यात आलेली होती. परंतु आता मध्य रेल्वेने याबाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून ही ट्रेन पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ४ नोव्हेंबर म्हणजेच उद्यापासून ही टॉय ट्रेन नेरळ आणि माथेरान दरम्यान धावणार आहे. त्यामुळे माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांना नयनरम्य अशा सौंदर्याचा आस्वाद घेता येणार आहे.

कसे आहे या टॉय ट्रेनचे वेळापत्रक ?

1- टॉय ट्रेन क्रमांक 52103 नेरळ होऊन सकाळी 8:50 मिनिटांनी सुटते आणि दररोज सकाळी साडेअकरा वाजता माथेरानला पोहोचेल.
2- टॉय ट्रेन क्रमांक 52105- नेरळ हुन सकाळी दहा वाजून 25 मिनिटांनी सुटते आणि दररोज दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी माथेरानला पोहोचते.
3- टॉय ट्रेन क्रमांक 52104- ही ट्रेन माथेरान दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी सुटते आणि दररोज साडेपाच वाजता नेरळला पोहोचेल.
4- टॉय ट्रेन क्रमांक 52106- ही ट्रेन माथेरानून संध्याकाळी चार वाजता सुटेल आणि दररोज संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी नेरळला पोहोचते.

कशी आहे या टॉय ट्रेनची रचना?

या टॉय ट्रेनमध्ये क्रमांक 52103/52104 एकूण 6 डब्यांची असून ज्यामध्ये तीन हे द्वितीय श्रेणीचे डबे आहेत तर एक विस्टाडोम कोच आणि दोन द्वितीय श्रेणी कम लगेच व्हॅन असतील. तसेच ट्रेन क्रमांक 52105/52106 मध्ये तीन द्वितीय श्रेणीचे डबे, एक प्रथम श्रेणी कोच व दोन द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅन कोच असणार आहेत.

या ठिकाणाच्या शटल सेवांच्या सुधारित वेळा

४ नोव्हेंबर पासून मध्ये रेल्वेच्या माध्यमातून अमन लॉज ते माथेरान दरम्यान सुरू असलेल्या शटल सेवांचे वेळापत्रक देखील बदलण्यात आलेले असून शनिवारी आणि रविवारी अमन लॉज आणि माथेरान दरम्यान प्रवासासाठी जास्तीचे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून दोन जोड्यांच्या विशेष शटल सेवा देखील चालवल्या जाणार आहेत. त्यातील पहिली म्हणजे..

माथेरान ते अमन लॉज शटल सर्विसेस

अमन लॉज ते माथेरान दरम्यान सुरू असलेल्या सध्याच्या शटल सेवेचे वेळापत्रक देखील मध्य रेल्वे ला प्राप्त झाले असून या शटल सेवेचे सुधारित वेळपत्रक चार नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. यामध्ये ट्रेन क्रमांक 52154 माथेरानून सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी सुटते आणि अमन लॉजला सकाळी आठ वाजून 38 वाजता पोहोचते. त्यातील ट्रेन क्रमांक 52156 माथेरानून सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी सुटते आणि अमन लॉजला सकाळी नऊ वाजून 28 मिनिटांनी पोहोचते. तसेच ट्रेन क्रमांक 52158 माथेरानून सकाळी 11:35 मिनिटांनी सुटते आणि अकरा वाजून 53 मिनिटांनी अमन लॉजला पोहोचते. त्यातीलच गाडी क्रमांक 52160 माथेरानून सकाळी नऊ वाजून 28 मिनिटांनी सुटते तर दुपारी दोन वाजून 18 मिनिटांनी अमन लॉजला पोहोचेल.

तसेच गाडी क्रमांक 52162 माथेरान या ठिकाणाहून दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी सुटते आणि अमन लॉजला तीन वाजून 33 मिनिटांनी पोहोचते. गाडी क्रमांक 52164 माथेरान हून 5:20 सुटते आणि पाच वाजून 38 मिनिटांनी अमन लॉजला पोहोचते. असेच सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून शनिवारी आणि रविवारी दोन विशेष शटल सेवा देखील चालवल्या जाणार आहेत. त्यातील पहिली म्हणजे माथेरानून सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि दहा वाजून 23 मिनिटांनी अमन लॉजला पोहोचेल. त्यातील दुसरी विशेष रेल्वे ही माथेरानून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि दुपारी एक वाजून 28 मिनिटांनी अमन लॉज ला पोहोचेल.

अमन लॉज वरून माथेरान शटल सर्विसेस वेळापत्रक
तसेच ट्रेन क्रमांक 52153 अमन लॉज येथून सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी सुटते आणि माथेरानला सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी पोहोचते. गाडी क्रमांक 52155 अमन लॉजवरून सकाळी नऊ वाजून 35 मिनिटांनी सुटते आणि माथेरानला सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी पोहोचते. त्यासोबतच गाडी क्रमांक 52157 अमन लॉज येथून दुपारी बारा वाजता निघेल आणि माथेरानला बारा वाजून 18 मिनिटांनी पोहोचेल. गाडी क्रमांक 52159 अमन लॉज येथून दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी सुटते आणि माथेरानला दोन वाजून 43 मिनिटांनी पोहोचते. गाडी क्रमांक 52161 अमन लॉज येथून दुपारी तीन वाजून 40 मिनिटांनी सुटते आणि माथेरानला तीन वाजून 58 मिनिटांनी पोहोचते. गाडी क्रमांक 52163 अमन लॉज येथून सायंकाळी पावणे पाच वाजता सुटते आणि माथेरानला सहा वाजून तीन मिनिटांनी पोहोचते.

अमन लॉज येथून माथेरान साठी विशेष सेवा
शनिवारी आणि रविवारी दोन विशेष सेवा देखील चालवल्या जाणार असून यातील पहिली विशेष ट्रेन अमन लॉज येथून सकाळी दहा वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि दहा वाजून 48 मिनिटांनी माथेरानला पोहोचेल. दुसरी विशेष ट्रेन अमन लॉज येथून दुपारी एक वाजून 35 मिनिटांनी सुटेल आणि दुपारी एक वाजून 53 मिनिटांनी पोहोचेल.
या पद्धतीने आता पर्यटकांसाठी विशेष गाड्या देखील सुरू करण्यात आल्या असून पर्यटकांना माथेरान जाण्या येण्यासाठी आता खूप मोठी सुविधा या माध्यमातून रेल्वेने उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आता पर्यटकांना माथेरान या ठिकाणचे निसर्ग सौंदर्याचा आनंद घेणे खूप सोपे होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe