अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- पन्नास पैशाच्या नाण्याच्या बदल्यात एक लाख रुपये मिळवायचे आहेत का? मग फक्त एकच गोष्ट करा, ती म्हणजे ‘ ओएलएक्स डॉट कॉम ‘ वर तुमचे नाव नोंदवा. तुम्हाला एक लाखांपेक्षाही अधिक पैसे हवे असतील, तर तुम्ही खरेदीदारास घासाघीस करू शकता.

नाण्यांचा संग्रह करण्याचा तुमचा छंद असेल, तर ही नाणी तुमच्या उपजीविकेचे साधन ही बनू शकतात. कारण ही नाणी दुर्मीळ असतील, तर ती विकून तुम्हाला लगेचच रोख रक्कमही मिळू शकते.

हेच पाहा ना, जर तुमच्याकडे ५0 पैशाचे जुने नाणे असेल, तर त्या बदल्यात तुम्हाला एक लाख रुपये मिळू शकतात. तुमच्याकडे ५० पैशाचे जुने नाणे असेल, तर ते तुम्ही ‘ ओएलएक्स ‘ वर विकू शकता आणि त्या बदल्यात चांगली रक्कमही मिळवू शकता.

त्यासाठी तुम्हाला या वेबसाइटवर तुमचे नाव नोंदवावे लागेल. नंतर तुमच्याकडे असलेल्या ५० पैशाच्या नाण्याचा फोटो काढून तो वेबसाइटवर अपलोड करावा लागेल.

ज्यांना ते विकत घ्यायची इच्छा आहे, ते खरेदीदार तुमच्याशी संपर्क साधतील. तेव्हा तुम्ही त्यांच्याशी किमतीवरून घासाधीसही करू शकता. इंडियामार्ट या वेबसाइटवरही जुनी नाणी आणि नोटांची खरेदी-विक्री सुरू असते.

लिलावही केले जातात आणि जी व्यक्ती अधिक बोली लावते, त्या व्यक्तीला ते नाणे अथवा नोटा मिळतात. येथेही घासाघीस करता येते. कॉइनबझार या वेबसाइटवरही अशा प्रकारची खरेदी-विक्री केली जाते.