file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  पावसाळ्यात नेहमीच बळावणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी बीट, गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच काकडी, तळलेले पदार्थापासून दूर राहण्यासाठी सागितले जाते.

पचनक्रिया सुरळीत हाेण्यासाठी दरराेज एक लिंबू आहारात असायला हवा, असा सल्ला आहारतज्ञांनी दिला आहे. सध्या पावसाळ्याचं आगमन झालं आहे.

या ऋतूमध्ये अनेक आजार डोके वर काढू शकतात. यासाठी आपली रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं महत्वाचं आहे. काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल.

  • १) आळशीच्या बीया आयुर्वेदाने अत्यंत गुणकारी सांगितल्या आहेत. एक चमचा आळशीत गरम दूधात घालून प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. आळशीमध्ये एलर्जिक सीलियम, ओमेगा-3 फॅटी एसिड्स असतात.

त्यांच्या सेवनाने अनेक आजार बरे होण्यास मदत होते. शरीरातील रक्तप्रवाह चांगला होण्यापासून कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आळशीच्या बीया फायदेशीर ठरतात.

  • २) तुळस हे भारतीय संस्कृतीमधील महत्वपूर्ण स्थान असलेली वनस्पती आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे रोप असते. ही तुळस बहुगुणी आहे. शरीरातील रोगप्रतिकारक वाढवण्यासाठी तुळस गुणकारी मानली जाते.

शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मदत होते. तसेच शरिरातील थकवा दूर करण्यासाठीही तुळस उपयुक्त ठरते. तुळशीमध्ये असलेले इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते.

  • ३) हळद सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असणारी आणि आहारामध्ये समाविष्ट असणारा घटक आहे. हळद एक उच्च दर्जाचे अँटिबायोटिक आहे. हळदीच्या सेवनाने आपले शरीराचे थंडी, फ्लू सारख्या इंफेक्शनपासून संरक्षण होते. यासोबतच या व्हायरसपासून लढण्यास शरीरास मदत होते.
  • ४) सर्दी खोकल्यावरील गुणकारी औषध म्हणून आलं आपल्याकडे प्रचलित आहे. अजीर्ण झाल्यास आल्याचे रसात लिंबाचा रस व मीठ घालून पाणी प्यावे. आले तोंडात ठेवताच लाळग्रंथी सक्रिय होतात. लाळ पाझरू लागते. आल्याचे सेवनाने पोटात गॅस तयार होत नाही.

पाेळी नको भाकरी खा पावसाळ्यात दोन्ही वेळेचा आहार लवकर घेतला पाहिजे. जेवनात रोज एक लिंबू खाल्यास अनेक आजार दूर राहतात. आहारात फळभाज्यांचा वापर करावा. तसेच पोळीऐवजी भाकरी खाणे अधिक फायदेशीर ठरेल

आजारी व्यक्तींनी असा घ्या आहार

  • पचनास हलके असे सूप, मऊ केलेली भाताची पेज घ्यावी
  • सफरचंद शक्‍यतो टाळावे
  • नारळपाणी पिऊ नये
  • बीट किंवा गाजर खावे
  • काकडी खाऊ नये, तळलेले पदार्थ टाळावेत