Ahmednagar Breaking : लोकसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके व भाजपाचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे यांच्यात हाय होल्टेज लढत होत असताना राहुरी तालुक्यातील सोनगांव येथे नीलेश लंके यांचा प्रचार फलक जाळण्याची घटना समोर आल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाच व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्री ही घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला. धानारे, सोनगांव, सात्रळ ग्रामस्थांच्या वतीने या घटनेचा जाहिर निषेध करण्यात येत आहे. ज्यांनी हे कृत्य केले त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारचे भ्याड हल्ले होणार असतील तर जशास तसे उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. कोणतेही संकट येवो, त्यास समोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
विरोधकांनी हे निच कृत्य केले आहे. समस्त धानोरे ग्रामस्थांच्या वतीने आम्ही या कृत्याचा निषेध करत आहोत. विरोधकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की आम्ही जशास तसे उत्तर देऊ शकतो.छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचे आम्ही अनुकरण करतो.
विरोधकांमध्ये धमक असेल तर त्यांनी समोर येउन लढावे. त्याच पध्दतीने आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. विरोधकांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करू नये ही आमची विनंती आहे. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी आहेत. विरोधक रडीचा डाव खेळत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी किरण पाटील कडू, सुर्यभान शिंदे, अमोल दिघे, सिताराम दिघे, कन्हैय्या दिघे, नरेंद्र आनाप, अजिम तांबोळी, पोपट दिघे, आदीनाथ दिघे, हर्षल कडू, जयराम दिघे, दानिश तांबोळी, अन्सार तांबोळी, अरूण दिघे, रमेश दिघे, दत्तात्रय पलघडम, कैलास पलघडम, संभाजी कडू, उदय कडू, सोमनाथ दिघे, संंदीप वाकचौरे, सागर डुकरे तसेच समन्वयक जगदीश गागरे यावेळी उपस्थित होते.