फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते

Published on -

श्रीमंती म्हणजे काय तर पैसा आणि प्रसिद्धी. याच दोन गोष्टींची चित्रपट तारे-तारकांना आवश्यकता असते. आता हे सगळं कुणामुळे मिळतं, तर गुरु ग्रहामुळे. तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह जेवढा मजबूत असतो तेवढा तो आपल्याला जास्त फेमस करतो. तोच कमकुवत असेल तर आपल्याला, यकृत, मूत्रपिंड, पोट, डोळे, कान, घसा, श्वासोच्छवास, बद्धकोष्ठता किंवा फुफ्फुसांशी संबंधित समस्या देतो. अशा परिस्थितीत, व्यक्तीला पुष्कराज रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो.

गुरु ग्रहामुळे काय मिळते?

तुम्ही पुष्कराज रत्न धारण करता तेव्हा ते तुम्हाला संपत्ती, मुले, आनंद, शांती, आध्यात्मिक वाढ, समृद्धी प्रदान करते. याशिवाय, शिक्षण क्षेत्रात प्रगतीसह तुमची बुद्धिमत्ता वाढविण्यास ते उपयुक्त मानले जाते. हे रत्न विवाहातील अडथळे देखील दूर करते. पण हे रत्न कोणी घालावे आणि कोणी घालू नये आणि त्याचे नियम काय आहेत.

पुष्कराज कुणी वापरावे?

ज्योतिषशास्त्रानुसार पुष्कराज रत्न धारण केल्याने मेष, वृषभ, सिंह, धनु आणि मीन राशीच्या लोकांना शुभ फळे मिळतात. यामुळे तुमचे जीवन आनंदी होते, परंतु वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी चुकूनही पुष्कराज रत्न धारण करू नये. याशिवाय जर तुमच्या कुंडलीत गुरु ग्रह नीच स्थितीत असेल तर तुम्ही ते घालणे टाळावे. कारण हे रत्न तुम्हाला अशुभ आणि नकारात्मक परिणाम देते.

पुष्कराज धारण करण्याचे नियम

– पुष्कराज रत्न धारण करण्यापूर्वी, ज्योतिषाकडून कुंडलीतील गुरू ग्रहाची स्थिती जाणून घ्या.
– हे रत्न नेहमी सोन्याच्या अंगठीत घालावे.
– गुरुवार आणि द्वितीया, एकादशी आणि द्वादशी या तिथी हे रत्न धारण करण्यासाठी शुभ मानल्या जातात.
– ते नेहमी हाताच्या तर्जनी वर घालावे.
– पुष्कराज रत्न धारण करण्यापूर्वी ओम ब्रिम बृहस्पत्ये नमः या मंत्राचा जप करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!