अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- देवळाली प्रवरा येथिल शेतकरी कुटुंबातील एक शेतकरी गेल्या दिड महिन्यापासुन नगर येथे उपचार घेत असताना शुक्रवारी सकाळी निधन झाले.

देवळाली प्रवरा नगर पालिकेने त्या शेतकऱ्याचा अंत्यविधी केला असुन कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या वृत्तास मुख्याधिकारी अजित निकत यांनी दुजोरा दिला आहे.

देवळाली प्रवरा येथिल शेतकरी कुटुंबातील 55 वर्षीय शेतकरी गेल्या दिड महिन्यापासुन नगर येथिल साईदिप रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असल्याचे समजते.

कोरोनाचा पुन्हा एकदा देवळाली प्रवरातील एकाचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोना काळातील लाँकडाऊन मध्ये शितीलता मिळाल्याने लग्न व इतर समारंभास गर्दी वाढू लागली.

त्यामुळे कोरोनाचा पुन्हा प्रसार वाढला होता. येथिल शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्यावर दिड महिणा उपचार करुन ही कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. देवळाली प्रवरा नगर पालिकेने शुक्रवार पासुन व्यापाऱ्यांसाठी कडक निर्बंध लागू केलेआहे.

दुपारी चार नंतर जी दुकाने सुरु राहतील त्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

दुपारी चार संचारबंदी काळात नागरिकांनी विनाकारण फिरु नये अशा नागरिकां विरुद्ध कायदेशिर कारवाई अथवा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले .