अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Business Idea : देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात शेतीत मोठा बदल करू लागले आहेत. बदलत्या काळानुसार आता आधुनिकतेची सांगड घालून शेतकरी राजा आता पीक पद्धतीत मोठा बदल करत आहे.

कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना शेतीमध्ये बदल करून नगदी (Cash Crop) तसेच बाजारात मागणी असलेल्या पिकांची लागवड करण्याचा सल्ला देत असतात.

बाजारपेठेत ज्या शेतमालाची अधिक मागणी असते त्याचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असतो. याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते मध्य प्प्रदेश राज्यातून.

मध्यप्रदेश राज्याच्या (Madhya Pradesh) शिंदवाडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाल भेंडीची शेती (Red Okra Farming) विशेष फायदेशीर ठरले आहे. भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यात असलेल्या परासिया जिल्ह्यातील कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना पीक उत्पादनात नवीन तंत्रांचा अवलंब करण्याच्या सूचना केल्या होत्या.

यातून प्रेरणा घेऊन जटाछापर येथील दोन शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीतून लाल भेंडीची लागवड करून चांगला बक्कळ नफा कमावला आहे. लाल भेंडीची लागवड केवळ शेतकऱ्यांसाठीच फायदेशीर नाही तर आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याने या पिकाला बाजारात मोठी मागणी असते.

लाल भेंडी आरोग्यासाठी आहे वरदान
पारंपरिक हिरव्या भेंडीच्या लागवडीपेक्षा लाल भेंडीची लागवड जास्त उत्पन्न देते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तसेच लाल भेंडीची किंमत देखील बाजारात अधिक असते.

या व्यतिरिक्त, लाल भेंडी खायला देखील स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असल्याचे सांगितलं जाते, होय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्चनुसार, लाल भेंडी हे आरोग्यासाठी रामबाण उपाय मानले जाते. लालभेंडी मध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे की आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात.

लाल भेंडीमध्ये लागणारे रोग आणि त्यावर प्रतिबंध उपाय
मित्रांनो, आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करत असतात. अल्प कालावधीत काढण्यासाठी तयार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना यातून चांगला फायदा देखील मिळत आहे.

लाल भेंडीची लागवड देखील इतर भाजीपाला वर्गीय पिकांप्रमाणेच अल्प कालावधीत शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देऊ शकते. याशिवाय, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की लाल भेंडीला इतर भाज्यांच्या तुलनेत रोगांचा धोका कमी असतो.

मात्र या लाल भेंडीला, लाल कोळी या किटकाचा धोका अधिक असतो. या किटकाचा थवा या पिकाच्या पानाखाली राहतो आणि हळूहळू पानांचा रस शोषून घेतो.

परिणामी, वनस्पती सुकते आणि पिवळी पडते. आणि झाडाची वाढही थांबते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जर अशी समस्या लाल भेंडीच्या पिकात आढळून आली तर ते टाळण्यासाठी डायकोफॉल किंवा सल्फर पिकावर फवारले पाहिजे.