अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

पाचवीचे 20 तर आठवीचे 15 विद्यार्थी अशा एकूण 35 विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे. या परीक्षेचा तात्पूर्ता निकाल हा 24 नोव्हेंबर 2021 ला प्रसिध्द झाला होता.

शुक्रवार (दि. 7) रोजी रात्री उशीरा राज्यस्तरीय याद्या आणि अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या निकालात पूर्व उच्चमध्ये साईराज अशोक कडूस हा राज्यात तिसरा व जिल्ह्यात प्रथम आला असून पूर्व माध्यमिकमध्ये ग्रामीण भागात उमर कलिम शेख व साक्षी सुदाम शिंदे राज्यात अनुक्रमे पहिल्या आणि दुसरी स्थानी आहेत.

त्याच सोबत पूर्व माध्यमिकची प्राजक्ता दीपक चव्हाण ही सीबीएसई-आयसीएसई विभागातून राज्यात पहिल्या स्थानी आहे. 12 ऑगस्ट 2021 ला शिष्यवृत्तीची परीक्षा झाली होती.

दरम्यान शिष्यवृत्तीच्या निकालामध्ये पाचवीचे जिल्हा परिषदे शाळेतील 228 आणि खासगी शाळेतील 449 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

तर आठवीचे जिल्हा परिषदेचे 28 आणि खासगी शाळेतील 614 विद्यार्थी गुणवत्ता यादीत असून हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.