अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- शहरातील बीड रोडवर जवळील शिक्षक कॉलनी या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी एस.टी.चालकाच्या घरावर तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकला.(Theft)

या दरोड्यात दरोडेखोरांनी ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विजय नवनाथ खुपसे (एस.टी ड्रायव्हर, रा. शिक्षक कॉलनी जामखेड) हे रात्री घरात झोपलेले असताना दि.२७ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात पाच दरोडेखोरांनी त्यांच्या किचनचा दरवाजा तोडला व घरात प्रवेश केला.

यानंतर खूपसे यांना तलवारीचा धाक दाखवून घरातील बेडरुममध्ये जाऊन कपाट तोडुन कपाटातील ९३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली.

घटनास्थळी अहमदनगर येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. एस.टी चालक विजय खुपसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात पाच दरोडेखोरांनविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत.