Health Marathi News : बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच तरुणांना अनेक आजार होईल सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोलेस्ट्रॉल (Cholesterol), ब्लडप्रेशरच्या (Blood pressure) समस्या प्रामुख्याने समोर येत आहेत. यासाठी आज आम्ही तुम्हाला त्यावर काय उपाय करावा हे स्ग्नर आहोत.

वेळेअभावी आपण जीवनावश्यक गोष्टींचे सेवन करू शकत नाही आणि ज्यातून आपल्याला पोषण मिळू शकेल अशा गोष्टींचा शोध घेता येत नाही.

मग तुमचा शोध इथेच संपतो. बीटचा रस सेवन केल्यास पौष्टिकतेसोबतच अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया बीटच्या (Beat) रसाचे फायदे.

रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते

बीटचा रस तुमचा रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतो. संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक दररोज 250 मिली बीटचा रस पितात त्यांच्यामध्ये सिस्टोलिक (Systolic) आणि डायस्टोलिक (Diastolic) दोन्ही स्तरांचे संतुलन होते.

बीटच्या रसामध्ये नायट्रेट संयुगे असतात जे रक्तातील नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात, ज्यामुळे रक्तदाब संतुलित करण्यास मदत होते.

हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो

बीटच्या रसामध्ये आढळणारे नायट्रेट हृदयाच्या विफलतेचा धोका कमी करते. संशोधनात असे दिसून आले आहे की ते हृदयाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. इतकेच नाही तर बीटचा रस प्यायल्याने मसल पॉवर वाढते.

कर्करोगाचा धोका कमी होतो

बीटरूटमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट (Antioxidant) असतात. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तसेच कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मदत करते. हे नवीन पेशींचे पुनरुज्जीवन करण्यास देखील मदत करते.

कोलेस्ट्रॉलच्या समस्येत आराम मिळतो

उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी बीटरूटचा रस खावा. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की बीटरूट अर्क कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.