Blood Sugar Level:- सध्या धावपळीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादींमुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि बहुसंख्य व्यक्तींमध्ये आता मोठ्या प्रमाणावर आढळून येणारा डायबिटीस म्हणजेच मधुमेह इत्यादी आजारांनी बरेच जण ग्रासले गेलेले आहेत.
यातील जर आपण डायबिटीस चा विचार केला तर अगदी 35 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्तींना देखील डायबिटीसचा प्रादुर्भाव झाला असून अनेक जण आपल्याला यामुळे त्रस्त असल्याचे दिसतात. आपल्याला माहित आहे की शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर डायबिटीसची शक्यता बळावते.
त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी म्हणजे शुगर लेवल योग्य प्रमाणात असणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे वेळोवेळी शुगर लेवल तपासून घेणे हे खूप महत्त्वाचे ठरते.या अनुषंगाने या लेखात आपण कोणत्या वयाच्या व्यक्तीच्या रक्तात किती साखरेची पातळी म्हणजे शुगर लेवल असावी बद्दलची महत्त्वपूर्ण माहिती बघू.
शुगर लेव्हल कशी तपासली जाते?
याबाबत वैद्यकीय तज्ञ म्हणतात की, जवळपास सर्व व्यक्तींची ब्लड शुगर ही एकसारखी असते. आपल्याला माहित आहे की जर आपण ब्लड शुगर तपासण्यासाठी गेलो तर ती जेवणापूर्वी आणि जेवणानंतर अशा दोन वेळेस तपासली जाते. यामध्ये उपाशीपोटी जेव्हा ब्लड शुगर तपासली जाते तेव्हा तिला फास्टिंग शुगर म्हणतात व जेवणाच्या दोन तासानंतर जी शुगर लेवल तपासली जाते
तिला पोस्ट मिल ब्लड शुगर असे म्हटले जाते. साधारणपणे शरीरात फास्टिंग ब्लड शुगर म्हणजे जेवणाच्या अगोदर तपासल्यानंतर ब्लड शुगरची सामान्य पातळी म्हणजेच नॉर्मल लेवल 100 mg/dL फोन कमी आणि पोस्ट मिल शुगर लेवल म्हणजे जेवणानंतर 120 ते 140 mg/dL च्या दरम्यान असते.
परंतु जेव्हा फास्टिंग शुगर 100 ते 125 mg/dL आणि जेवणानंतर म्हणजेच पोस्टमिल शुगर लेवल 140 ते 160 mg/dL असेल तर त्याला प्री डायबिटीस मानले जाते. अशा वेळेस जर रुग्णांनी शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न केले तर डायबिटीस पासून बचाव करता येऊ शकतो.
वयानुसार किती असावी रक्तात साखरेची पातळी?
1- वय वर्ष 6- शुगर लेवल जेवणापूर्वी 80 ते 180 mg/dL आणि जेवणानंतर एक ते दोन तासांनी 180 mg/dL तर झोपताना 110 ते 200 mg/dL असणे गरजेचे आहे.
2- सहा ते बारा वर्ष वयोगट– जेवणापूर्वी 90 ते 180 mg/dL तसेच जेवणाच्या एक ते दोन तासानंतर 140 mg/dL आणि झोपताना शंभर ते 180 mg/dL असणे गरजेचे आहे.
3- 13 ते 19 वयोगट– जेवणापूर्वी 90 ते 130 mg/dL आणि जेवणानंतर एक ते दोन तासांनी 140 mg/dL आणि झोपताना 90 ते 150 mg/dL दरम्यान शुगर लेवल असायला हवी.
4- 20 ते 26 वयोगट– या वयोगटांमध्ये फास्टिंग ब्लड शुगर 100 ते 180 mg/dL आणि पोस्ट प्रांडियल ब्लड शुगर 180 mg/ आणि रात्री जेवण झाल्यावर 100 ते 140 mg/dL दरम्यान असावी.
5- 27 ते 32 वयोगट– फास्टिंग ब्लड शुगर 100 mg/dL
पोस्ट प्रांडियल ब्लड शुगर 90 ते 110 mg/dL आणि रात्री जेवण झाल्यावर 100 ते 140 mg/dL
6- 33 ते 40 वयोगट– फास्टिंग ब्लड शुगर 140 mg/dL पेक्षा कमी, पोस्ट प्रांडियल ब्लड शुगर 160 mg/dL पेक्षा कमी आणि रात्री जेवण झाल्यावर 90 ते 150 mg/dL
7- 40 ते 50 वयोगट– फास्टिंग ब्लड शुगर 90 ते 130 mg/dL, पोस्ट प्रांडीयल ब्लड शुगर 140 mg/dL कमी आणि रात्री जेवण झाल्यावर 150 mg/dL