Diabetes : तुम्हालाही असेल मधुमेहाचा त्रास तर आवर्जून खा ‘हे’ फळ, इतर आजारही राहणार दूर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Diabetes : सध्याच्या काळात अनेकजण मधुमेहासारख्या आजाराने त्रस्त आहेत. मधुमेह हा आयुष्यभराचा आजार असून जर यात साखरेची पातळी वाढली किंवा कमी झाली तर वेगवेगळे जीवघेणे आजार होण्याची भीती असते. सर्वात महत्वाचे म्हणजे हा आजार शरीरातील साखरेची पातळी तुमच्या खाण्याच्या सवयींवर अवलंबून असते.

अशातच जर तुम्हालाही मधुमेहाचा आजार असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही आता घरी बसुन या आजारावर नियंत्रण मिळवू शकता. फक्त तुम्हाला जांभूळ खावे लागणार आहे.जर तुम्ही नियमित जांभूळ खाल्ले तर तुम्हाला या आजारापासून सुटका मिळेल.

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे फायदे

हिमोग्लोबिन वाढण्यास होते मदत

जांभूळ हे व्हिटॅमिन सी आणि लोहाने समृद्ध असते. त्यामुळे जर हे फळ तुम्ही खाल्ले तर तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. लोह हे रक्त शुद्ध करणारे म्हणून काम करत असून वाढलेले हिमोग्लोबिन तुमचे हे रक्त अवयवांना जास्तीत जास्त ऑक्सिजन वाहून नेण्यास आणि तुमचे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करत असते.

त्वचा राहते निरोगी

जांभळात तुरट गुणधर्म असल्याने जे त्वचेचे डाग, मुरुम, सुरकुत्या आणि मुरुमांपासून संरक्षण करत असतात. तसेच, व्हिटॅमिन सी रक्त शुद्ध करण्यास मदत करत असल्याने ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार राहते.

मधुमेह आटोक्यात येतो

ज्या लोकांना मधुमेह आहे ते जांभूळ खाऊ शकतात कारण त्यामध्ये कॅलरीज कमी असतात. तसेच जांभळात असणारे पॉलीफेनॉलिक घटक मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करत असतात.

वजन कमी होते

यात कॅलरीज कमी असल्याने फायबरने समृद्ध असतात. त्यामुळे वजन कमी होते. जांभळामुळे पचनक्रिया सुधारून शरीरातील पाण्याची साठवणूक कमी होते.

जठरासंबंधी आरोग्य सुधारण्यास होते मदत

जांभूळ हे पाचन समस्यांवर उपचार करण्यास मदत करते. यामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म असतात त्यामुळे ते शरीर आणि पचनसंस्था थंड ठेवतात. तसेच ते बद्धकोष्ठतेपासून आराम देतात.

असे करा सेवन

सध्या अशी अनेक फळे आहेत जी खाल्ल्याने मधुमेह वाढतो, परंतु जांभळाच्या बाबतीत असे नाही. कारण जांभूळ खाल्ल्यानंतर तुमची साखरेची पातळी सहज नियंत्रित होऊ शकते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जांभूळाच्या पानांचा दशमी किंवा उकडीचे चूर्ण पिऊ शकता.