आरोग्य

Gender Change Surgery : काय सांगता! प्राणी स्वतःचे लिंग स्वतःच बदलू शकतात पण मानवी लिंग बदलासाठी शस्त्रक्रिया का केली जाते?

Published by
Ahmednagarlive24 Office

Gender Change Surgery : पृथ्वीवर अनेक प्रकाचे जीव- जंतू आहेत. प्रत्येकाही स्वतःची एक वेगळी ओळख असते. तसेच प्रत्येक प्राण्याला किंवा सजीवाला त्याच्या लिंगावरून ओळखले जाते. काही प्राणी खूप हुशार असतात ते स्वतःचा रंग किंवा आकार देखील बदलू शकतात.

प्राण्यांमध्ये नैसर्गिकरित्या त्यांचे लिंग बदलण्याची क्षमता आहे का?

कधी ना कधी तुम्ही सर्वांनी Transmale किंवा Transfemale असे शब्द ऐकले असतील. सध्या हे प्रकार वाढायला लागेल आहेत. पुरुष स्त्री आणि स्त्री पुरुष असे लिंगबदल केले जात आहेत. जर एखाद्या स्त्रीला पुरुष होईचे असेल तर तिला तिचे लिंग बदलावे लागते. तसेच पुरुषाच्या बाबतीत देखील आहे. जर पुरुषाला स्त्री होईचे असेल तर त्याला देखील लिंगबदल करावा लागतो.

जेव्हा एखादा पुरुष लिंग बदलतो तेव्हा त्याला ट्रान्सफेमेल म्हणतात आणि जेव्हा एखादी स्त्री पुरुष होण्यासाठी तिचे लिंग बदलते तेव्हा त्याला ट्रान्समेल म्हणतात.

मात्र स्त्री आणि पुरुषाला जर लिंग बदल कराचे असतील तर त्यासाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते. तसेच यासाठी यंत्राची आवश्यकता असते. मानवाला नैसर्गिकरित्या लिंग बदलणे शक्य नाही. मात्र काही प्राणी नैसर्गिकरित्या लिंग बदलू शकतात.

प्राणी त्यांचे लिंग का बदलतात?

प्राण्यांचे लिंग बदलण्याच्या प्रक्रियेला सिक्वेन्शिअल हर्माफ्रोटिझम असे म्हणतात. हे लिंगबदलांगे अनेक करणे आहेत. हवामानातील बदल हे सर्वात मोठे कारण आहे. तसेच इतरही अनेक कारणे आहेत.

कोणते प्राणी त्यांचे लिंग बदलू शकतात?

माशांमध्ये लिंग बदल करण्याची क्षमता अधिक आहे. समुद्रात आढळणारा जोकर मासा आपले लिंग अगदी सहज बदलतो. जर जोकर माशाचा नर मासा मरण पावला, तर मादी मासा नवीन जोडीदार शोधत नाही, तर स्वतःला नर मासे बनवते. हा लिंगबदल केल्यानंतर पुन्हा लिंग बदलता येऊ शकत नाही.

Bluehead Wrasse माशामध्ये देखील लिंग बदलण्याची क्षमता आहे. जेव्हा ब्लूहेड माशांच्या गटातील सर्व नर मरतात, तेव्हा सर्वात मोठी मादी मासे स्वतःला नर माशात बदलते जेणेकरून त्यांची पिढी पुढे चालू ठेवू शकेल. नर Bluehead Wrasse माशामध्ये लिंग बदलण्याची क्षमता नसते.

बेडूक देखील त्याचे लिंग सहज बदलू शकतो. त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी हा लिंग बदल केला जातो. मादी बेडूक स्वतःला नर बेडकामध्ये बदलते. मात्र नर बेडकाला मादी बेडकामध्ये बदलता येत नाही.

मानवांमध्ये लिंग बदलाची शस्त्रक्रिया कशी केली जाते?

वरील प्राणी सहज नैसर्गिकरित्या त्यांचे लिंग बदलू शकतात. मात्र मानवी लिंग बदलणे इतके सोपे नाही. मानवी लिंग बदलण्यासाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते. सर्वप्रथम मानसिक चाचणी घ्यावी लागते. यानंतर उपचार सुरू होतात ज्यामध्ये व्हाया हार्मोन थेरपी सुरू होते. ज्या मुलाला मुलीच्या संप्रेरकाची गरज असते, तो त्याच्या शरीरात इंजेक्शन आणि औषधांद्वारे पोचवला जातो.

सुमारे 4 डोस घेतल्यानंतर हार्मोनल बदल होऊ लागतात. त्यानंतर लिंग बदलाची प्रक्रिया सुरू होते. या संपूर्ण प्रक्रियेत पुरुष किंवा स्त्रीच्या प्रायव्हेट पार्टचा आणि चेहऱ्याचा आकार बदलला जातो. पुरुष बनू इच्छिणाऱ्या स्त्रीचे स्तन प्रथम काढले जातात आणि पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट डेव्हलप केला जातो.

जो व्यक्ती पुरुषातून स्त्री बनते, त्या स्त्रीचे स्तन आणि प्रायव्हेट पार्ट तिच्या मांसापासून बनवले जातात. शरीर लिंग पुनर्नियुक्ती शस्त्रक्रियेमध्ये बरेच डॉक्टर उपस्थित असतात. मानसोपचारतज्ज्ञ, सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि न्यूरोसर्जन असणे महत्त्वाचे आहे.

Ahmednagarlive24 Office