Health Tips: हाडे आणि ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवायचे असेल तर आहारात ‘या’ पिठाच्या चपात्या खा! एफएसएसआयने दिली महत्वाची माहिती

Ajay Patil
Published:
health tips

Health Tips:- शरीराचे उत्तम आरोग्य हे अनेक प्रकारच्या संतुलित आहारावर प्रामुख्याने अवलंबून असते व संतुलित आहारामध्ये भाजीपाला तसेच गहू, ज्वारी, बाजरीच्या भाकरी पासून तर अंडी, चिकन, मटन आणि माशांसारखा मांसाहारी पदार्थांचा आहारात समावेश करतो तसेच अनेक फळे व दूध देखील महत्त्वाचे ठरते.

चांगल्या आरोग्याकरिता ज्या पौष्टिक पदार्थ किंवा घटकांची आवश्यकता असते त्यांची पूर्तता अशा संतुलित आहाराच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे संतुलित आहार आरोग्य करिता खूपच फायदेशीर आहे. या दृष्टिकोनातून जर आपण बऱ्याच जणांच आहार पाहिला तर आपण ज्वारी किंवा बाजरीची भाकर किंवा गव्हाच्या चपात्या यांचा मोठ्या प्रमाणात आहारात समावेश करतो.

जर आपण चपात्या किंवा पोळ्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर गव्हाच्या पिठाच्या पोळ्या मोठ्या प्रमाणावर खाल्या जातात. परंतु या व्यतिरिक्त या गव्हाच्या पिठापासून शरीराला आवश्यक असलेले चांगले पोषक घटक मिळावेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर आहारामध्ये फोर्टीफाइड गव्हाचा वापर करणे खूप गरजेचे आहे.

एफएसएसआयनुसार बघितले तर त्यांच्यामते गहू आणि तांदूळ सोबत इतर धान्यांना देखील फोर्टीफाइड केले जाऊ शकते. यामुळे संबंधित पिठातील किंवा धान्यातील पौष्टिक घटकांमध्ये वाढ होण्यास मदत होते व शरीराला जास्तीचे पोषक घटक मिळतात व त्याचा फायदा आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो. त्यामुळे या लेखात आपण गव्हाच्या पिठातील पौष्टिक गुणधर्म कसे वाढवता येऊ शकतात याबद्दल माहिती घेऊ.

 गव्हाच्या पिठाला फोर्टिफाईड कशा पद्धतीने करतात?

गव्हाचे जे काही सामान्यपणे पीठ वापरतो त्याला जास्त प्रमाणामध्ये पौष्टिक बनवायचे असेल तर त्यामध्ये तुम्ही फॉलिक ऍसिड, विटामिन बी 12 आणि लोहसारख्या इतर पोषक घटकांची जोड देऊ शकतात. यामध्ये जेव्हा गहू दळून त्यांच्यापासून पीठ तयार केले जाते तेव्हाही प्रक्रिया पूर्ण होते.

फॉर्टीफाइड गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खाल्ल्याने काय फायदा मिळतो?

1- गव्हाच्या पिठाला फॉर्टीफाइड केल्यामुळे त्यातील पोषक घटकांचे प्रमाणामध्ये वाढ होते व पिठामध्ये लोह तसेच विटामिन बी 12 आणि फॉलिक ऍसिड यासारखे महत्त्वाचे पोषक घटक मिसळले जातात व अशा पिठापासून जर तयार केलेल्या चपात्या खाल्ल्या तर शरीराला पूर्ण ऊर्जा मिळते व शरीराला ताकद मिळून थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.

2- गव्हाच्या पिठात लोह, फॉलिक ऍसिड आणि विटामिन बी 12 असल्यामुळे ॲनिमियाशी लढण्यासाठी आणि शरीरात रक्त तयार करण्याकरिता आवश्यक घटक मिळतात व रक्ताभिसरण देखील सुरळीत राहते..

3-फॉर्टीफाइड गव्हाच्या पिठाच्या चपात्या खाल्ल्यामुळे हाडे देखील मजबूत होण्यास मदत होते.

फॉर्टीफाइड गव्हाचे पीठ कुठे मिळते कसे ओळखाल?

तुम्हाला देखील आहारामध्ये या फॉर्टीफाइड गव्हाच्या पिठाच्या चपात्यांचा समावेश करायचा असेल तर तुम्ही कुठल्याही दुकानांमधून या पिठाची खरेदी करू शकतात. कारण हे पीठ आपल्याला कुठल्याही दुकानात अगदी सहजपणे मिळते. या पद्धतीचे पीठ जर तुम्हाला ओळखायचे असेल तर अशा गव्हाच्या पिठाच्या पॅकेटवर  F+ असे लिहिलेले असते.यावरून तुम्ही या फोर्टीफाईड पिठाला ओळखू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe