१ जानेवारी २०२५ मुंबई : दरवर्षी, तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यासाठी प्रत्येकजण नवीन वर्षाचे संकल्प करण्यास उत्सुक असतात.कारण, बहुतेक लोकांना निरोगी जीवनशैली बाळगण्याची इच्छा असते; परंतु त्याकरता नेमके काय करावे किंवा कुठून सुरुवात करावी, याबाबत गोंधळल उडालेला असतो. हृदयाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या महत्त्वाच्या पैलूंपैकी एक आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. या नवीन वर्षांत हृदयासाठी आरोग्यदायी आणि निरोगी हृदयासाठी काही सवयी अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे,असे आरोग्यतज्ज्ञांनी म्हटले आहे.
हृदयाचे आरोग्य हे विविध आरोग्य समस्यांना आमंत्रण देते.यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, उच्च कोलेस्टेरॉल, तीव्र थकवा, मूत्रपिंडाचा आजार, स्लीप एपनिया, नैराश्य, चिंता आणि अगदी गंभीर प्रकरणांमध्ये स्मृतिभ्रंशाचे काही प्रकार समाविष्ट असू शकतात, म्हणूनच तरुण प्रौढांसाठी हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरते
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी, तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय असल्याची खात्री करा. दैनंदिन दिनचर्येतून किमान ३० ते ४० मिनिटे आवडीनुसार व्यायाम करा. यामध्ये चालणे, धावणे, योगासने, ध्यान करणे किंवा पोहणे यासारखे व्यायाम करण्याचा प्रयत्न करू शकता. हे हृदयाला बळकट करतात, रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करतात.
निरोगी आणि संतुलित आहाराचे सेवन करत नियमितपणे खाण्यावर लक्ष केंद्रित करा. जेवणात भरपूर भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने यांचा समावेश असावा. हे पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहेत, कारण ते तुमचे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. प्रक्रिया केलेले किंवा पॅकेज फूड खाणे टाळा, असेही त्यांनी सांगितले.
नियमित आरोग्य तपासणी टाळू नका. ते महत्त्वपूर्ण आहेत आणि एकूण आरोग्याबद्दल, विशेषतः हृदयाच्या आरोग्याबद्दल माहिती पुरवते. यामुळे गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता कमी होते जे धूम्रपान किया मद्यपान यांसारख्या सवयी हृदयाच्या आरोग्यासाठी हानीकारक असू शकतात. हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढवतात ते रक्तवाहिन्यांचे नुकसान करतात. मद्यपान केल्याने रक्तदाबाच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या सतावते. या सवयी टाळणे हा हृदयाच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी घेतलेला सर्वोत्तम निर्णय आहे.
हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या विकृती किंवा समस्या शोधण्यात मदत करते. पूर्णपणे बरे वाटत असले, तरीही नियमित आरोग्य तपासणीचे वेळापत्रक करत असल्याची खात्री करा. तणाव हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यामध्ये व्यत्यय आणू शकतो. जास्त ताण घेतल्याने शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढू शकते, जी कालांतराने हृदयाला हानी पोहोचवू शकते. तणाव पातळी व्यवस्थापित करण्यासाठी आणि नियंत्रित राखण्यासाठी सक्रिय पावले उचला. खोल श्वासोच्छवासाचे व्यायाम केल्याने तणावाची पातळी नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते.