अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  आज आम्ही तुम्हाला देशातील पाच सर्वात स्वस्त बाइक्स संबंधी माहिती देणार आहोत. या बाइकमध्ये शानदार मायलेज मिळते.

या बाइक्स मुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला मोठी बचत करता येऊ शकते. याशिवाय, आज आम्ही तुम्हाला या बाइक्सचे परफॉर्मन्स, मायलेज,आणि किंमती संबंधी माहिती देत आहोत.

Bajaj Platina 100 (बजाज प्लेटिना 100) :- यामध्ये १०२ सीसी इंजिन दिले आहे. याचे इंजिन ७.९ पीएसचे पॉवर आणि ८.३ एमएमचे टॉर्क जनरेट करते. यात ४ स्पीड गियरबॉक्स ट्रान्समिशन मिळतो. यात ९६.९ किमीचे मायलेज मिळते.एक्स शोरूम किंमत ५९ हजार ४० रुपये आहे.

Honda SP-125 (होंडा एसपी-125) :- या मध्ये पॉवरसाठी १२३.९४ सीसीचे इंजिन दिले आहे. जे 8kW चे मॅक्सिमम पॉवर आणि १०.९ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते यात ६५ किमीचे मायलेज मिळते. यात ड्रम व्हेरियंटची दिल्ली एक्स शोरूम किंमत ७८ हजार ९४७ रुपये आहे.

Hero HF 100 (हीरो एचएफ 100) :- या बाईक मध्ये ९७.२ सीसीचे इंजिन दिले आहे. याचे इंजिन ७.९१ बीएचपीचे पॉवर आणि ८.०५ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन ४ स्पीड गियरबॉक्स दिले आहे. यात ९.१ लीटरचे पेट्रोल टँक दिले आहे. यात ७० किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज मिळते. किंमत ५० हजार ९०० रुपये आहे.

Bajaj CT100 (बजाज सीटी100) :- या बाइक मध्ये १०२ सीसीचे इंजिन इंजिन दिले आहे. याचे इंजिन ७.९ पीएसचे पॉवर आणि ८.३४ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन ४ स्पीड गियरबॉक्स दिले आहे. यात १०.५ लीटरचे पेट्रोल टँक दिले आहे. यात ८९.५ किमी प्रति लीटरचे शानदार मायलेज मिळते. किंमत ५३ हजार ६९६ रुपये आहे.

TVS Sport (टीवीएस स्पोर्ट) :- यामध्ये ९९.७ सीसीचेइंजिन दिले आहे. याचे इंजिन ८.१ बीएचपीचे पॉवर आणि ८.७ एमएमचे टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन ४ स्पीड गियरबॉक्स ट्रान्समिशन दिले आहे. यात १० लीटरचे पेट्रोल टँक दिले आहे. यात ७४ किमी प्रति लीटरचे मायलेज मिळते. एक्स शोरूम किंमत ५८ हजार १३० रुपये आहे.