अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Farmer success story : माणसाच्या प्रयत्नात जर प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम यशस्वी रित्या केले जाऊ शकते. मग अशा प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या माणसाला साधने मर्यादित असली तरी अनंत शक्यता दिसतात.

असा अवलिया फक्त आणि फक्त डोळ्यासमोर एक उद्दिष्ट ठेवतो आणि ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या कल्पनेचाच विचार करत असतो. एकूणच काय इच्छा असेल तर मार्ग दिसतोच.

याचीच प्रचिती आली आहे ती महाराष्ट्रातील सांगली जिल्यात. सांगली जिल्ह्यातील एका प्रगतिशील अवलिया शेतकऱ्याने एक भन्नाट आयडिया लावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सांगली मधील एका अवलियाने शेतजमीन उपलब्ध नसल्याने शेती करण्यासाठी एक वेगळा मार्ग चोखाळला. या अवलियाने जमिनीविना शेती सुरु केली आहे.

आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो या अवलियाने चक्क बिसलरी बाटल्यांमध्ये वांग्याची शेती सुरु केली आहे.

फक्त वांग्याच लावलेत असं नाही तर या अवलिया शेतकऱ्याने बिसलरीच्या बाटली वांग्यासमवेतच मिरचीचेही पीक घेतले आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या मौजे पणुंब्रे वरुण येथील फाळके कुटुंबियांनी बिसलरीच्या बाटलीत वांगी आणि मिरची उत्पादित करण्याची किमया साधली आहे.

घराबाहेरील छोट्या जागेत या शेतकऱ्याने बिसलरीच्या बाटल्या जमिनीच्या दिशेने उलट्या टांगून वांग्याची लागवड केली आहे.

या शेतकऱ्याच्या घरा समोरुन जाणारे लोक बीसलरीमध्ये लावलेल्या या वांग्याचे आणि मिरचीच्या रोपांकडे बघतात आणि निश्चितच या शेतकऱ्याचे कौतुक करतात.

फाळके कुटुंब पणुंब्रे गावात राहते आणि मासेमारी करून आपला उदरनिर्वाह भागवते. त्यांच्याकडे शेती नव्हती, पण या घरातील तरुण सदस्याचा हट्ट असा होता की, तो जे स्वतः पिकवेल तेच खाईल.

यामुळे या शेतकऱ्याने सुरुवातीला बिसलरीच्या बाटलीत वांग्याचे एक रोप लावून प्रयोग केला. रोपे वाढत असल्याचे पाहून त्याने यामध्ये वाढ केली.

सांगलीच्या शेतकऱ्याचा पॅटर्नच गाजतोया फाळके कुटुंबीयांच्या घराबाहेर आता बिसलेरी मध्ये अशी अनेक झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे आता लागवड केलेल्या वांग्याच्या झाडांपासून उत्पादन देखील मिळू लागले आहे. आतापर्यंत 5 किलो वांग्याचे उत्पादन त्यांना मिळाले आहे आणि त्यांनी सर्व वांगी आपल्या स्वतःसाठी वापरली आहेत.

कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, जेव्हा पहिल्यांदा वांगी तुटली तेव्हा त्यांना सुरुवातीला विश्वासच बसला नाही. यानंतर त्यांचे अभिनंदन करणाऱ्यांची झुंबड उडाली. मग बघता बघता मिरचीचेही उत्पादन घ्यायला सुरवात झाली.

फाळके कुटुंबीयांच्या घराबाहेरील ही झाडे लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या झाडांना पाहण्यासाठी अनेकजण येतात, फाळके कुटुंबीयांकडून या वनस्पतींबद्दल विविध प्रकारचे प्रश्न विचारतात.

गेल्या काही दिवसांपासून या भागात अशा युनिक शेतीकडे कल वाढला आहे. काही दिवसांनी आणखी अनेक भाजीपाला आणि इतर पिके अशा प्रकारे उगवताना दिसतील एवढे नक्की.