2000 Rupees Note News: नोटाबंदीच्या 6 वर्षानंतर अर्थमंत्र्यांनी 2000 च्या नोटेबाबत केली मोठी घोषणा ! जाणून तुम्हाला बसेल धक्का

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2000 Rupees Note News:  तुम्ही देखील 2000 रुपयांच्या नोटांचा वापर करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2000 रुपयांच्या नोटांबाबत मोठी माहिती दिली आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे कि ही माहिती नोटाबंदीच्या तब्बल 6 वर्षानंतर समोर आली आहे. तुम्हाला हे माहिती असेल कि आज सोशल मीडियावर 2000 रुपयांच्या नोटांबद्दल अनेक बातम्या समोर येत आहे. यातच 2000 च्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेने बँकांना काही आदेश दिले आहेत का? हा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे मात्र आता खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत याबाबत मोठा खुलासा केला आहे.

संसदेत अनेक प्रश्न विचारले

आजकाल बँकांच्या एटीएममधून 2000 रुपयांऐवजी 500 आणि 200 रुपयांच्या नोटा बाहेर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. 2000 रुपयांच्या नोटा बाजारातून काढून टाकण्याचा सरकारचा विचार आहे का? हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला आहे. लोकसभेत खासदार संतोष कुमार यांनी अर्थमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारले आहेत, ज्यांची उत्तरे खुद्द अर्थमंत्र्यांनीच दिली आहेत.

अर्थमंत्र्यांनी माहिती दिली

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत खुलासा केला की आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार मार्च 2017 आणि मार्च 2022 अखेर 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 9.512 लाख कोटी आणि 27.057 लाख कोटी होते.

आरबीआयने निर्देश जारी केले नाहीत

यासोबतच अर्थमंत्र्यांनी असेही सांगितले की, रिझर्व्ह बँकेने बँकांना अशा कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. कोणत्या मूल्याची नोट आणि कधी टाकायची हे बँकेनेच ठरवले आहे. यासोबतच अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार 2019-20 सालापासून 2000 रुपयांची नोट छापण्यात आलेली नाही.

हे पण वाचा :-  Summer Business Idea : उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ व्यवसाय ! दरमहा होणार 40 हजारांची कमाई ; जाणून घ्या कसं