70-year-old Vicco Turmeric Story : तब्बल ७० वर्षांपूर्वी स्वयंपाक घरात तयार झाली विको, घरा घरात पोहोचलेल्या विकोचा जाणून घ्या खडतर प्रवास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

70-year-old Vicco Turmeric Story : कोणतेही उत्पादन बनवणे सोपे असते मात्र त्याचे मार्केटिंग करणे खूप अवघड असते. लोकांच्या नजरेत त्या वस्तूचे मार्केटिग करणे खूप अवघड असते. मात्र एखाद्या कंपनीने यशस्वी आणि विश्वासदर्शक वस्तू बनवल्यास त्याचे ब्रॅण्डिंग करणे खूप सोपे जाते.

आजही भारतीय मार्केटमध्ये अनेक जुन्या वस्तू आहेत ज्या लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. शेकडो कंपन्या एकाच वस्तूचे प्रोडक्ट बनवत असतात मात्र त्या वस्तूची लोकांच्या मनात जागा निर्माण करणे खूप कठीण असते.

विकोचा प्रवास 1952 मध्ये सुरू झाला

आज प्रत्येक घराघरामध्ये आढळणारी विकोचा प्रवास हा तब्बल ७० वर्षे जुना आहे. 1952 मध्ये विकोचा प्रवास सुरु झाला. 1952 मध्ये विकोचे पहिले प्रोडक्ट बाजारात सादर करण्यात आले. टूथपेस्ट आणि पावडरच्या बाबतीत विको हा देशातील पहिला आयुर्वेदिक ब्रँड आहे.

रेशन दुकानदाराने कंपनी स्थापन केली

तुम्ही अनेकदा टेलिव्हिजनवर विकोची जाहिरात पाहिली असेल. त्यानंतर तुम्हाला लगेचच त्याचे ‘वीको टरमरिक, नहीं कॉस्मेटिक, वीको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम’ और ‘वज्रदंती, वज्रदंती वीको वज्रदंती’ हे शब्द आठवत असतील.

विकोचे पूर्ण नाव विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात एका रेशन दुकानदाराने केली आहे. नागपुरात रेशन दुकान चालवणाऱ्या केशव विष्णू पेंढारकर यांनी 1952 मध्ये याची सुरुवात केली आहे.

केशव विष्णू पेंढारकर हे एक रेषांचे दुकान चालवत होते. मात्र या रेशनच्या दुकानावर त्यांच्या कुटुंबाचा उदर्निर्वाह होत नव्हता. त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्यांनी बांधली होती.

केशव विष्णू पेंढारकर यांनी मुंबईमध्ये येऊन काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला आणि ते कुटुंबासह मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये ते त्यांच्या स्वप्नांसह काहीतरी नवीन करण्याच्या हेतूने सुरुवात केली.

केशव विष्णू पेंढारकर यांनी मुंबईमध्ये आल्यानंतर वांद्रे आणि उपनगरात काही छोटे व्यवसाय सुरू केले. परळमध्ये येऊन त्यांनी अ‍ॅलोपॅथिक औषधे आणि पॉन्ड्स, निव्हिया, अफगाण स्नो यांसारख्या कॉस्मेटिक उत्पादने बनवण्याकडे लक्ष केंद्रित केले. त्यांना आयर्वेदिक औषधांबाबत ज्ञान होते. यामध्ये त्यांना त्यांच्या मेहुण्याने मदत केली.

घरगुती टूथ पावडर

केशव विष्णू पेंढारकर हे त्यांच्या कुटुंबासोबत ३ खोल्यांच्या घरामध्ये राहत होते. यामध्येच त्यांनी आयुर्वेदिक उत्पादने बनवण्यास सुरुवात केली. घरातील दोन खोल्या कार्यालय आणि गोदाम झाले आणि त्यातील स्वयंपाक घर उत्पादन बनवण्यास वापरू लागले.

अशा प्रकारे विकोला सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी आयुर्वेदिक उत्पादन ‘विको वज्रदंती टूथ पावडर’ तयार केली. दात स्वच्छ करण्यासाठी 18 जडीबुटी असलेली ही टूथ पावडर तयार केली.

त्यांची कल्पना यशस्वी झाली

केशव विष्णू पेंढारकर यांनी उत्पादन तयार केले मात्र त्याचे मार्केटिंग करणे अंडी ते लोकांपर्यंत पोहोचवणे खूप कठीण होते. यावर केशव यांनी एक चांगला मार्ग काढला आणि त्यांचा हा मार्ग यशस्वी झाला.

केशव यांनी त्यांच्या मुलांसह लोकांच्या घरोघरी जाऊन विको टूथ पावडरची विक्री आणि प्रचार सुरू केला. हे करणे त्यांच्यासाठी खूपच अवघड होते. त्यांच्यासाठी हा एक खडतर प्रवास होता. मात्र त्यांनी हार मानली नाही.

त्यांच्या या खरडतर प्रवासाला यश आले आणि लोकांच्या मनामध्ये हळूहळू विको टूथ पावडरचा ठसा उमटू लागला. त्यांच्या या प्रयत्नाला इतके यश आले की ४ वर्षात त्यांनी मोठी प्रगती केली. यानंतर त्यांना त्यांचे उत्पादन तयार करण्यासाठी औद्योगिक शेड खरेदी करावी लागली.

मुलाने पहिली आयुर्वेदिक टूथपेस्ट बनवली

टूथ पावडर नंतर आता टूथपेस्टची बवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. लोक हळूहळू टूथ पावडरऐवजी टूथपेस्ट वापरत असल्याचे पाहून केशव पेंढारकर यांनी विकोची टूथपेस्ट सुरू करण्याचा विचार केला.

केशवचा मुलगा गजाननने फार्मसीची पदवी मिळवून १९५७ मध्ये या व्यवसायात प्रवेश केल्यावर विकोला अधिक बळ मिळाले. केशवने गजानन पेंढारकर यांना औषधी वनस्पतींच्या मदतीने टूथपेस्ट तयार करण्यास सांगितले.

यानंतर विको वज्रदंती टूथपेस्ट बनवण्यासाठी गजाननला 7 वर्षे लागली. हा तो काळ होता जेव्हा बहुतेक टूथपेस्टमध्ये फ्लोराईड होते. ब्रश करताना ही टूथपेस्ट कोणी गिळली तर ती शरीरासाठी हानिकारक ठरते. मुलांसाठी ते आणखीनच घातक होते. त्याचवेळी विकोने आयुर्वेदातील नैसर्गिक घटकांचे गुणधर्म असलेली टूथपेस्ट बनवली, जी रसायनमुक्त होती.

केशवनंतर गजाननने कंपनी ताब्यात घेतली

केशव यांचे १९७१ साली निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा गजानन पेंढारकर याने विको कंपनीची धुरा सांभाळली. ज्यावेळी केशव यांचे निधन झाले तेव्हा कंपनीची उलढाल फक्त १ लाख रुपये होती. यानंतर गजानन यांनी कंपनीचा व्यवसाय वाढवला.

Vico Turmeric Skin Cream ची तयारी

टूथपेस्टनंतर विकोची वाटचाल Turmeric Skin Cream कडे सुरु झाली. 1975 मध्ये गजानन यांनी स्किनकेअर श्रेणीमध्ये उत्पादन बनवण्यास सुरुवात केली. विको टर्मरिक स्किन क्रीम सादर केल्यांनतर लोकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला.

जाहिरातींच्या विविध पद्धतींचा अवलंब केला

कालांतराने लोक विश्वास ठेवू लागले की Vico Turmeric Cream सुरक्षित आहे. विकोच्या मार्केटिंगसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. एक काळ असा होता की विकोचे सेल्समन नेहमी आरसा घेऊन किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांना ऑन-द-स्पॉट क्रीम दाखवायचे. या पद्धतीचा खूप परिणाम दिसून आला आणि विको क्रीमने लोकांच्या हृदयापासून ते बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली.

बाकीची प्रसिद्धी मिळवण्यासाठी रेडिओवरील आकर्षक जिंगल्स आणि थिएटरमध्ये त्याच्या जाहिरातींनी काम केले. यानंतर, जेव्हा 80 च्या दशकात टीव्हीचा ट्रेंड वाढू लागला, तेव्हा विको क्रीम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी टीव्ही जाहिरातींचा वापर केला जाऊ लागला.

असे म्हटले जाते की गजानन पेंढारकर हे भारतात टीव्ही शो प्रायोजित करण्याची कल्पना शोधणारे पहिले व्यक्ती होते. याची सुरुवात 1984 मध्ये दूरदर्शनवरील ‘ये जो है जिंदगी’ या शोने झाली.

इतकंच नाही तर जाहिरातींसाठीही चित्रपटांच्या व्हिडीओ कॅसेटचा वापर केला जात होता. विकोच्या जिंगल्स तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलुगु, ओरिया, बंगाली, गुजराती, मराठी या प्रदेशानुसार वेगवेगळ्या भाषांमध्ये डब केल्या गेल्या.