Aadhar Card Update : मोठी बातमी! आधारकार्ड धारकांना मिळणार या सुविधांचा मिळणार मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card Update : देशातील सर्व नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. महत्वाच्या कागदपत्रांपैकी आधारकार्ड हे एक अतिशय महत्वाचे कागदपत्र आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत आधारकार्ड बंधनकारक आहे.

कोणत्याही सरकारी किंवा खाजगी ठिकाणी तुम्ही कामानिमित्त गेला तर तुम्हाला सर्वात प्रथम आधारकार्ड मागितले जाते. त्याशिवाय तुमचे कोणतेही काम होऊ शकत नाही. पण आधारकार्डद्वारे तुम्ही सरकारी योजनांचा देखील लाभ घेऊ शकता.

कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेईचा असेल तर तुमच्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. तसेच UIDAI कडून सतत आधार कार्डमध्ये बदल केले जात आहेत. त्यामुळे या बदलांचे सर्व तपशील आधारकार्ड धारकांकडे असणे आवश्यक आहे.

UIDAI चे हे सर्व नियम पाळावे लागतील

UIDAI कडून आता आधारकार्ड बाबत नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे. जर तुमचे आधारकार्ड १० वर्षांपूर्वीचे असेल तर तुमच्यासाठी UIDAI ने महत्वाचे अपडेट आणले आहे. १० वर्षांपूर्वी किंवा त्यापेक्षाही कोणाचे आधार कार्ड असेल तर त्यांना ते अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे.

UIDAI कडून आधारकार्ड अपडेट करण्यास सांगितले आहे. जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर तुम्ही 4 जून 2023 पर्यंत तुमचे आधार कार्ड पूर्णपणे मोफत अपडेट करू शकता.

सरकारकडून आधारकार्ड अपडेट करायला १५ मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुमचेही आधार कार्ड १० वर्षे किंवा त्यापेक्षा जुने असेल तर तुम्हाला देखील ते अपडेट करणे आवश्यक आहे.

या सर्व गोष्टी करू शकत नाही

जर तुम्ही UIDAI च्या नवीन नियमानुसार आधारकार्ड अपडेट केले नाही तर तुम्हाला सरकारी योजना, बँकिंग आणि आर्थिक व्यवहार सुरळीत करता येऊ शकणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला आर्थिक व्यवहार करताना किंवा सरकारी योजनांचा लाभ घेताना समस्या निर्माण होऊ शकतात.

जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर तुम्हाला वळच्या CSC आधार केंद्रावर जावे लागेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे जुने आधारकार्ड अपडेट करून घेऊ शकता.