Bank Holiday: RBI ची मोठी घोषणा ! मे महिन्यात ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद ; जाणून घ्या नेमकं कारण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Holiday: देशाची सर्वात मोठी बँक RBI एक मोठी घोषणा करत पुढील महिन्यात ( मे 2023) देशातील बँका तब्बल 12 दिवस बँका बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे जर तुमचे देखील काही काम बँकेत असेल तर तुम्ही ते पटकन करू घ्यावा नाहीतर तुम्हाला अडचणींना तोंड द्यावे लागेल .

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. RBI च्या म्हणण्यानुसार मे 2023 मध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. मात्र, या 12 सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारचाही समावेश करण्यात आला आहे.

सुट्ट्या प्रादेशिक आधारावर आहेत

वास्तविक  बँकांच्या बहुतांश सुट्ट्याही प्रदेशाच्या आधारेच राहतात. 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे. त्यामुळे 1 मेची सुट्टी फक्त महाराष्ट्रातच राहणार आहे. उर्वरित देशातील बँका नेहमीप्रमाणे सुरू होतील. अशा अनेक सुट्ट्या आहेत. ज्यांचा केवळ प्रादेशिक आधारावर समावेश करण्यात आला आहे. मे 2023 मध्ये फक्त 12 दिवस आहेत जेव्हा अनेक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका शनिवार व रविवारसह बँकांच्या सुट्ट्यांमुळे बंद राहतील. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मे 2023 मध्ये एकूण सुट्ट्यांची संख्या देखील 12 निश्चित करण्यात आली आहे.

येथे सुट्ट्यांची यादी आहे

1 मे – महाराष्ट्र दिन (फक्त महाराष्ट्रातच सुट्टी राहणार )

5 मे – बुद्ध पौर्णिमा ( अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, लडाख, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मुंबई, मिझोराम, पंजाब, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये सुट्टी )

9 मे – गुरु रवींद्रनाथ टागोर जयंती ( पश्चिम बंगालमध्ये सुट्टी )

16 मे – सिक्कीमचा राज्यत्व दिन ( सिक्कीममध्ये सुट्टी)

22 मे – महाराणा प्रताप जयंती ( गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये बँका बंद राहतील)

24 मे – काझी नजरुल इस्लाम जयंती ( त्रिपुरामध्ये का बंद राहतील)

टीप : दुसरा आणि चौथा शनिवार तसेच  रविवार या दिवसांच्या सुट्यांची नोंद केलेली नाही

हे पण वाचा :- IMD Rain Alert : अर्रर्र .. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रसह ‘या’ भागात पुन्हा थैमान घालणार मुसळधार पाऊस ; जाणून घ्या हवामान अंदाज