Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Best Summer Destination : सुट्ट्यांमध्ये महाराष्ट्रातील या सवोत्तम पर्यटन स्थळांना द्या भेट, सहलीचा आनंद होईल द्विगुणित

तुम्हालाही फिरायला जायचे असेल महाराष्ट्रातील काही सर्वोत्तम पर्यटन स्थळे तुमच्यासाठी आकर्षक ठरू शकतात. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या राज्यात किंवा देशात फिरायला जायची गरज नाही.

Best Summer Destination : अनेकजण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला जात असतात. उन्हाळ्यामध्ये अनेकांना सुट्टी असते त्यामुळे फिरायला जाण्याचा प्लॅन केला जातो. पण अनेकदा फिरायला जायचे असते मात्र पर्यटन स्थळे माहिती नसतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्हीही महाराष्ट्रीयन असाल तर तुम्हाला बाहेर कुठेही फिरायला जायची गरज नाही. कारण महाराष्ट्रात एक से बढकर एक पर्यटन स्थळे आहेत. जी तुमची सहल आनंददायी बनवू शकतात. महाराष्ट्रात उन्हाळ्यामुळे उष्णता जास्त असते. त्यामुळे अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक असतात.

पण थंड हवेची अनेक ठिकाणे महाराष्ट्रात देखील आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात महाराष्ट्राबाहेर फिरायला जाण्याची काहीही गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातील हिल स्टेशनला भेट देऊ शकता. तसेच रायगड, इगतपुरी, लवासा, माथेरान, खंडाळा, लोणावळा, माळशेज घाट या ठिकाणी देखील फिरायला जाऊ शकता.

मालवण

Malvan

मालवण हे एक महाराष्ट्रातील सुंदर पर्यटन स्थळ आहे. मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोटे किनारपट्टी असलेले पर्यटन स्थळ आहे. तुम्हाला समुद्र किनारी फिरायला जायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट देऊ शकता.

पवना तलाव कॅम्पिंग

Pawna Lake

तुम्हाला शांत आणि निसर्ग रम्य वातावरणात कॅम्पिंग करायचे असेल तर तुमच्यासाठी पवना तलाव कॅम्पिंग हा एक चांगला पर्याय आहे. लोणावळा हिल स्टेशनपासून काही अंतरावर पवना तलाव कॅम्पिंग आहे. या ठिकाणी तुम्ही १ ते २ दिवसाच्या सहलीचे नियोजन करू शकता. या ठिकाणची घनदाट झाडी आणि लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापूर किल्ला, तिकोना किल्ला या ठिकाणी फिरू शकता.

आंबोली

Amboli

तुम्हाला आंबोली या पर्यटन स्थळाबाबत काही माहिती नसेल. मात्र हे ठिकाण घनदाट जंगलात, सपाट पर्वतरांगांमध्ये वसलेले हे हिल स्टेशनमध्ये वसलेले आहे. आंबोली येथून समुद्राचे चित्तथरारक दृश्य पाहण्याबरोबरच तुम्ही महादेवगड पॉइंट, पूर्विचा वास, कोकण किनारा, नागट्टा फॉल्स, नारायण गड, बॉक्साईट माईन्सलाही भेट देऊ शकता.

लोणावळा

Wondering How To Make Your Trip To Lonavala? Read This!

लोणावळा या पर्यटन स्थळाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणी तुम्हाला हिरवळ, धबधबे, पर्वत आणि हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळतील.

लोणावळ्याच्या आसपास अनेक ठिकाणे आहेत जसे की कुणे धबधबा, आंबी व्हॅली, भिवपुरी, जुम्मापट्टी धबधबा, पवना तलाव, लोणावळा तलाव, राजमाची किल्ला या ठिकाणांना देखील भेट देऊ शकता.