Best Summer Destinations : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये द्या या पर्यटन स्थळांना भेट, कुटुंबासोबत तुमचीही सहल होईल आनंददायी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Summer Destinations : प्रत्येकाला उन्हाळ्यामध्ये सुट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत अविस्मरणीय सहल करायची असते. मात्र अनेकजण अशी सहल करण्यासाठी सर्वोत्तम पर्यटन स्थळे शोधत असतात. मात्र अनेकांना देशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांविषयी माहिती नसते.

भारतात अशी अनेक प्रसिद्ध आणि सुंदर पर्यटन स्थळे आहेत ज्याठिकाणी तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत सहलीचा आनंद घेऊ शकता. या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी तुम्ही साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता.

1. डोभी गाव 

हिमाचल प्रदेशामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही उन्हाळ्यामध्ये भेट देऊ शकता. कुल्लू जिल्ह्यातील डोभी या गावी भेट देऊन तुम्ही सुंदर नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेऊ शकता. कुल्लू आणि मनाली मार्गे या ठिकाणी तुम्ही सहज येऊ शकता. हिमालयाच्या सुंदर खोऱ्यांमध्ये पॅराग्लायडिंग आणि रिव्हर राफ्टिंगचा आनंद या ठिकाणी तुम्ही कुटुंबासोबत घेऊ शकता.

2. कामशेत

महाराष्ट्रातही अनेक सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. कामशेत हे एक महाराष्ट्रातील सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य पाहण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. येथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कॅम्पिंग, रॉक क्लाइंबिंग, कयाकिंग आणि हायकिंग करू शकता.

3. डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज

मेघालयातील नोंगबरेह येथे बांधलेला हा 500 वर्ष पूल आहे. हा पूल झाडांच्या मुकल्यांपासून बनवलेले आहे. या ठिकाणी हा पूल पाहण्यासाठी लाखो पर्यटक गर्दी करत असतात. हा पूल खासी जमातीच्या लोकांनी बांधला होता.

4. लक्षद्वीप

तुम्हालाही मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत साहसी खेळांचा आनंद घेईचा असेल तर तुम्ही लक्षद्वीप या पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता. स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, काईट सर्फिंग, पॅराग्लायडिंग, कॅनोइंग यासारख्या साहसी खेळांचा आनंद तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. या पर्यटन स्थळाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात.

5. सुंदरबन

सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे संरक्षित खारफुटीचे जंगल आहे, तुम्हाला येथे अनेक वन्यजीव पाहायला मिळतील. जसे बंगाल वाघ, लहान पंजे असलेले ऑटर, डॉल्फिन इ. या पर्यटन स्थळाला देखील दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात.

6. केरळ

केवळ हे एक देशातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकणी समुद्र किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी लाखो लोक येत असतात. पर्वत, धबधबे इत्यादींसाठी देखील हे प्रसिद्ध ठिकाण आहे. स्नेक बोट रेस आणि हाऊसबोटमध्ये राहण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.