Dhananjay Powar : फेमस रिल्सस्टार धनंजय पोवारने सुरु केला भन्नाट व्यवसाय! धाराशिवमध्ये सुरु केले डी पी अमृततुल्य…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dhananjay Powar : महाराष्ट्रातील फेमस रिल्सस्टार आणि प्रसिद्ध उद्योगपती डी पी म्हणजेच धनंजय पोवार हा थोड्याच दिवसांत खूपच लोकप्रिय झाला आहे. नुकताच त्याने चला हवा येउद्या कार्यक्रमातही मंच गाजवला आहे. त्यामुळे तो आणखीनच फेमस झाला आहे.

धनंजय पोवार हा पहिल्यापासूनच पेशाने उद्योजक आहे. त्याने आता पुन्हा एकदा नवीन व्यवसाय सुरु केला आहे. धाराशिव परिसरामध्ये त्याने आता डी पी अमृततुल्य चहाचा व्यवसाय सुरु केला आहे. धनंजय पोवार यांनी नवीन चहाचा व्यवसाय सुरु केल्याने पुन्हा एकदा तो चांगलाच चर्चेत आला आहे.

धनंजय पोवार याचा चहाच्या दुकानाचे उदघाटन करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो नवीन दुकानाचे उदघाटन करताना दिसत आहे.

धनंजय पोवार याचा हा तिसरा व्यवसाय असून त्यांच्या वडिलांचे ६० हजार स्क्वेअर फूट परिसरात सोसायटी फर्निचरचा खूप मोठा व्यवसाय आहे. सध्या धनंजय पोवार त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळतात. सोशल मीडियावर सतत सोसायटी फर्निचरमधील व्हिडीओ ते अपलोड करत असतात.

वडिलांचा फर्निचरचा व्यवसाय सांभाळत धनंजय पोवार यांनी “आईसाहेब वस्त्रम” हा व्यवसाय देखील सुरु केला आहे. त्याच्या सर्वच व्यवसायांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. धनंजय पोवार हा सतत कॉमेडी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत असतो.

धनंजय पोवार याचे लाख फॅन्स आहेत. तसेच हेच फॅन्स त्याला नेहमी सपोर्ट करत असतात. सोशल मीडियावर तो नेहमी ऍक्टिव्ह असतो. तसेच त्याला क्रिकेट खेळण्याची देखील खूप आवड आहे हे नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येते.

धनंजय पोवार यांच्या या यशामागे त्यांच्या वडिलांचा हात आहे हे गेल्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओमधुन दिसून आले आहे. त्यांनी हे सर्व व्यवसाय सुरु करण्यासाठी किती मेहनत घेतली ते या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगत असतात.

धनंजय पोवार यांचे इचलकरंजीत ६० हजार स्क्वेअर फूट परिसरात सोसायटी फर्निचर नावाने दुकान आहे. त्यांचे हे दुकान महाराष्ट्रभर फेमस झाले आहे. त्यांच्या दुकानाला त्यांचे अनेक फॅन्स नेहमी भेट देऊन फर्निचर खरेदी करत असतात.

धनंजय पोवार यांच्या या यशामागे खूप मोठा खडतर प्रवास आहे. तो जाणून घेऊया… धनंजय पोवार यांचे वडील पाचवी इयत्तेत शिकत होते. घरातील भावंडांमद्धे ते सर्वात लहान होते. त्यांचे थोरले बंधू हे नोकरीनिमित्त मुंबईला आले मात्र इथे त्यांचा जम बसला नाही.

शेवटी गावी जाऊन त्यांनी एका फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक दुकानात नोकरी करण्याचे ठरवले. त्यावेळी दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांना ज्या फर्निचरची आवश्यकता होती ते फर्निचर तिथे मिळत नसायचे. याचाच विचार करून त्यांच्या भावाने फर्निचरचे एक छोटेसे दुकान थाटले.

त्यांच्या या सुरुवातीच्या लूकमध्ये बाहेरून फर्निचर आणावे लागायचे त्यामुळे त्यांच्या भावाला सतत बाहेरगावी जावे लागायचे. म्हणून डी पी पोवारचे वडील दुकानावर जाऊन बसायचे.

कालांतराने त्यांच्या भावंडांनी या दुकानात दुकानात भागीदारी केली त्यांनतर धनंजय पोवार यांच्या वडिलांनी यामधून बाहेर पडत पानटपरीचा व्यवसाय सुरु केला. मात्र या व्यवसायामध्ये त्यांना यश न आल्याने त्यांनी हा व्यवसाय बंद केला.

पुढे त्यांनी वायरमनचे काम करण्यास सुरुवात केली. हातात पिशवी घेऊन त्यांनी गावोगावी फिरत वायरमनचे काम करू केले. या ठिकाणी देखील त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी भावाच्या मदतीने एका छोट्या दुकानात फर्निचरचा व्यवसाय सुरु केला.

यानंतर सुरु झाला त्यांच्या भरभराटीचा प्रवास. हळूहळू त्यांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे आर्थिक परिस्थिती देखील सुधारत गेली. यानंतर त्यांनी इचलकरंजीमध्ये ६० हजार स्क्वेअर फूट परिसरात भलेमोठे फर्निचर दुकान उभे केले.

त्यांच्या या दुकानाची प्रसिद्धी झाली ती म्हणजे धनंजय पोवार याच्या सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे. अख्या कोल्हापुरात फेमस झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या फर्निचरच्या दुकानाची ख्याती पसरली.

धनंजय पोवार यांच्या या फर्निचरच्या शोरूम मध्ये अनेक कामगार कामाला आहेत. तसेच ते सतत या कामगारांसोबत व्हिडीओ बनावट असतात. तसेच त्यांच्यासोबत पार्टी करतानाचे देखील व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात. फर्निचरच्या दुकानात आलेल्या त्यांच्या ग्राहकांसोबत देखील ते कॉमेडी व्हिडीओ बनवत असतात.