Electric Bike : सिंगल चार्जमध्ये 125 Km रेंज देणारी इलेक्ट्रिक बाईक लॉन्च! जाणून घ्या किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric Bike : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात आता आणखी एका कंपनीची इलेक्ट्रिक बाईक लॉन्च झाली आहे. या बाईकमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. ही बाईक सिंगल चार्जमध्ये १२५ किमीपर्यंत रेंज देत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आणखी एका इलेक्ट्रिक बाईकचा पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध झाला आहे.

दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढत असल्याने ग्राहकांच्या मागणीनुसार अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने मार्केटमध्ये लॉन्च केली आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीपासून ग्राहकांना सुटका मिळत आहे.

Odysse Vader ही बाईक दुचाकी बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. तुम्ही एकदा ही बाईक चार्ज केल्यानंतर १२५ किमी प्रवास करण्यास तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. १२५ किमी तुम्ही बिनधास्त प्रवास करू शकता.

या बाईकमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक देण्यात आला आहे. बाईकची बॅटरी चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात. चार तासामध्ये पूर्णपणे बॅटरी चार्ज होते. एकदा चार्ज केल्यानंतर तुम्हाला १२५ किमी पर्यंत बाईक चालवता येऊ शकते.

या बाईकमध्ये 85 kmph चा टॉप स्पीड देण्यात आला आहे. तसेच या बाईकमध्ये इतर इलेक्ट्रिक बाईकपेक्षा अधिक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना सर्वाधिक फीचर्स असणारी इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे.

बाईकमध्ये मिडनाईट ब्लू, फेयरी रेड, ग्लॉसी ब्लॅकसह पाच रंगांचे पर्याय उपलब्ध

या Odysse Vader इलेक्ट्रिक बाईकमध्ये 3.7 kWh बॅटरी देण्यात आली आहे. या बाईकमध्ये 3 kW मोटार जोडण्यात आली आहे. ही बॅटरी 170 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या मते, ही बाईक मिडनाईट ब्लू, फेयरी रेड, ग्लॉसी ब्लॅक, व्हेनम ग्रीन आणि मिस्टी ग्रे या एकूण पाच रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

किंमत आणि वैशिष्ट्ये

या बाईकची किंमत 1,09,999 रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे. तसेच Odysse Vader इलेक्ट्रिक बाईकमध्ये 7 इंच इंस्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. बाईक कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टीम (CBS) आणि पुढच्या आणि मागील बाजूस डिस्क ब्रेकसह सुसज्ज आहे. त्यामुळे ही बाईक सुरक्षित राइड सुनिश्चित करते.