Gold Price Update : खुशखबर! सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, पहा 14 ते 24 कॅरेटचे नवीन दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Update : देशात सध्या लग्नसराई सुरु झाली आहे. त्यामुळे अनेकजण सराफा बाजारात जाऊन सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करत आहेत. पण सोन्याची किमती उच्चांक दरापेक्षा जास्त वाढल्यानंतर आता त्या पुन्हा एकदा स्वस्त झाल्या आहेत.

तुम्हीही सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशीही देशात सोन्याच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

सध्या सोन्याचा दर 60355 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74556 रुपये किलो दराने विकली जात आहे. सोमवारी सोन्याच्या दरात किरकोळ घसरण पाहायला मिळत आहे. तर चांदीचे दर वाढल्याचे दिसत आहेत. सोमवारी चांदीचा भाव 268 रुपयांनी वाढून 74556 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे.

नवीनतम 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर

देशात सराफा बाजारामध्ये पुन्हा एकदा सोने आणि चांदीचे नवीनतम दर जाहीर करण्यात आले आहेत. सोन्याच्या घसरणीनंतर 24 कॅरेट सोने 268 रुपयांनी स्वस्त होऊन 60355 रुपये झाले आहे. 23 कॅरेट सोने 265 रुपयांनी स्वस्त होऊन 60115 रुपये झाले आहे.

22 कॅरेट सोने 246 रुपयांनी स्वस्त होऊन 55285 रुपये झाले आहे. 18 कॅरेट सोने 201 रुपयांनी स्वस्त होऊन 45266 रुपये झाले आहे. 14 कॅरेट सोने 158 रुपयांनी स्वस्त होऊन 35307 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

सोने 400 रुपयांनी तर चांदी 5400 रुपयांनी स्वस्त झाली आहे

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी उच्चांकी उसळी पाहायला मिळाली आहे. सतत सोने आणि चांदीचे दर वाढतच होते. मात्र आता सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे.

आता सध्या सराफा बाजारामध्ये सोने उच्चांक दरापेक्षा 426 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त मिळत आहे. 5 एप्रिल 2023 सोन्याच्या दराने आजपर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक गाठला होता. त्यामुळे सोने आणि चांदीचे दागिने खरेदीदारांची डोकेदुखी वाढली होती.

सध्या देशात लग्नसराई सुरु असल्याने सोने आणि चांदीच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. सराफा बाजारामध्ये सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.