Irrigation Subsidy : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता पाईपलाईन करण्यासाठी मिळणार बंपर सबसिडी, असा करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Irrigation Subsidy : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. तसेच अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील केली जात आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने सरकारकडून शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी अशा योजना राबवल्या जात आहेत.

सरकारकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमधून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. पण सरकारकडून अनेक योजनांमार्फत शेतकऱ्यांना सबसिडी देखील दिली जात आहे.

आता शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी सरकारकडून सबसिडी दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाईपलाईन करताना जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. सबसिडी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना एक अर्ज करावा लागेल. त्यानंतरच सबसिडी दिली जाईल.

सिंचन अनुदान म्हणजे काय?

भारतातील निम्म्याहून अधिक लोक शेतीवर अवलंबून आहेत. हे लोक शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पण शेतीला पुरेसे पाणी देता येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतीच्या सिचनसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

शेतीला पुरेसे पाणी असेल तर पीक चांगले येते अन्यथा शेतकऱ्यांचे पैसे वाया जातात. अनेक शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाईपलाईन करायची असते मात्र पुरेसे पैसे नसतात. हेच लक्षात घेत सरकारकडून आता शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी सबसिडी दिली जात आहे.

सबसिडीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागेल. सरकारने सिंचन व्याप्ती वाढवण्यासाठी PDMC योजनेंतर्गत लहान आणि लहान शेतकर्‍यांना ठिबक आणि तुषार सिंचन प्रणाली बसविण्यास प्रोत्साहित केले आहे. अल्पभूधारक शेतकर्‍यांना सूचक युनिट खर्चाच्या 55% आणि इतर शेतकऱ्यांना 45% दराने आर्थिक सहाय्य अनुदान देते.

सिंचनाचा सर्वोत्तम प्रकार कोणता आहे?

शेतीला पाणी देण्यासाठी अनेक सिंचनाचे प्रकार आहेत. पण यातील ठिबक सिंचन हे एक सर्वात उत्तम शेतीला पाणी देण्यासाठी वापरले जाणारे सिंचन आहे. यामुळे पाणी हळूहळू पिकांच्या मुळापर्यंत पोहचते. तसेच पाण्याची बचत देखील होते.

सिंचन पाइपलाइन योजनेची उद्दिष्टे

पाण्याची बचत आणि पाण्याचा योग्यरीत्या वापर हा सिंचन पाईपलाईन करण्यामागचा उद्देश आहे. ठिबक सिंचनामुळे 20 ते 25 टक्के पाण्याची सहज बचत होते. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना सबसिडी दिली जात आहे. सरकारच्या कृषी पोर्टलवर जाऊन तुम्ही सबसिडीसाठी अर्ज करू शकता.

आवश्यक कागदपत्रे

शेतकऱ्याचे रहिवासी प्रमाणपत्र
अर्जदाराचे आधार कार्ड
बँक पासबुक
मोबाईल नंबर
ओळखपत्र
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
आधार कार्ड
जमीन अतिक्रमण
पाईप बिल