Jio Fiber Free connection : मस्तच! आता पैशांची गरज नाही, मोफत बसवा Jio Fiber, असा घ्या ऑफरचा लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio Fiber Free connection : कोरोना काळापासून इंटरनेटच्या वापरामध्ये खूपच वाढ झाली आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करण्याची संधी दिल्याने सर्वांनाच इंटरनेटची आवश्यकता आहे. त्यामुळे अनेकांनी घरामध्ये इंटरनेट कनेक्शन बसवून घेतले आहे.

तुमच्याही कुटुंबामध्ये सर्वाधिक इंटरनेटचा वापर केला जात असल्यास तुमच्यासाठी जिओने भन्नाट ऑफर आणली आहे. तुमच्यासाठी रिलायन्स जिओ टेलिकॉम कंपनीकडून इंटरनेटसाठी एक ऑफर आणली आहे.

तुम्हीही मोफत एक रुपयाही न देता Jio Fiber चा सेटअप बॉक्स बसवून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कसलेही पैसे देण्याची गरज नाही. जिओ फायबर कनेक्शनसह राउटर विनामूल्य स्थापित केले जाईल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5G हाय स्पीड इंटरनेट मिळेल. यामुळे संपूर्ण घरातील सदस्य या हायस्पीड इंटरनेटचा वापर करू शकतात.

जिओ फायबर हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन मोफत सेटअप

जिओ टेलिकॉम कंपनीकडून देशभारतील काही मोजक्या शहरांमध्ये 5G हाय स्पीड इंटरनेट सुविधा सुरु केली आहे. त्याचा तुम्हीही आनंद घेऊ शकता. यासाठी तुमचा मोबाईल 5G असणे आवश्यक आहे किंवा तुम्हाला Jio Fiber कनेक्शन घ्यावे लागेल.

जिओ कंपनीकडून ग्राहकांना Jio Fiber कनेक्शन देण्यासाठी २ हजार रुपये चार्ज आकारत होती. मात्र जिओकडून ग्राहकांना मोफत Jio Fiber कनेक्शन दिले जात आहे. त्यामुळे तुम्ही जिओच्या या ऑफरचा लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला Jio Fiber कनेक्शनचा सेटअप बॉक्स मोफत दिला जाईल.

JioFiber एंटरटेनमेंट बोनान्झा

जिओकडून Jio Fiber कनेक्शनचा सेटअप बॉक्स ग्राहकांना मोफत देण्यासाठी JioFiber Entertainment Bonanza अशी ऑफर सुरु केली आहे. याचा लाभ फक्त फक्त जिओचे पोस्टपेड ग्राहकच घेऊ शकतात.

जिओचे पोस्टपेड ग्राहक Jio Fiber चा संपूर्ण सेटअप मोफत मिळवू शकतात. यामध्ये तुम्हाला सिक्युरिटी चार्जेस, इन्स्टॉलेशन चार्जेस आणि ऍक्टिव्हेशन सारखे शुल्क भरावे लागणार नाही. या ऑफर अंतर्गत, हाय स्पीड इंटरनेट वापरण्यासाठी, एखाद्याला आवश्यकतेनुसार एका महिन्यासाठी रिचार्ज करावे लागेल ज्याची किंमत 399 पासून सुरु होते.

अमर्यादित 5G हायस्पीड इंटरनेट डेटा मिळेल

जिओ Fiber कनेक्शन घेतल्यानंतर तुम्ही अमर्यादित 5G हाय स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. तसेच तुम्हाला ऑफरमध्ये 14 OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. यामध्ये Disney+ Hotstar, Zee5, Sonyliv, Voot, Sunnxt, Discovery+, Hoichoi, Altbalaji, Eros Now, Lionsgate, ShemarooMe, Universal+, Voot Kids आणि JioCinema यांचा समावेश आहे.

JioFiber मोफत कनेक्शन कसे मिळवायचे?

जर तुम्हालाही Jio Fiberचे मोफत कनेक्शन हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला जिओच्या अधिकृत वेबसाइटला द्यावी लागेल. तसेच Jio Fiberसाठी अर्ज करावा लागेल. तुम्ही ही सर्व प्रक्रिया घरबसल्या करू शकता.