Online Shopping Fraud : ऑनलाइन शॉपिंग करताना चुकूनही करू नका या ४ चुका, अन्यथा लागेल हजारोंना चुना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Online Shopping Fraud : आजकाल सर्वजण धावपळीचे जीवन जगत आहेत. कामाच्या आणि इतर गोष्टींमुळे अनेकांना घराबाहेर जाऊन शॉपिंग करण्यासाठी देखील वेळ नाही. त्यामुळे असे लोक घरबसल्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवरून शॉपिंग करत असतात.

पण तुम्ही वेळ वाचवण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर लवकरच सावध व्हा. कारण आता ऑनलाईन शॉपिंग करत असताना तुमची देखील फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना साधगिरी बाळगली पाहिजे.

ऑफलाईन पद्धतीने खरेदी करण्याकडे अनेकांचा कल कमी होत चालला आहे. घरबसल्या सर्वकाही खरेदी करणे शक्य असल्याने अनेकजण घरी बसूनच शॉपिंग करत आहेत. ऑनलाईन शॉपिंग करत असताना ऑफर्स दिल्या जातात.

मात्र अशा ऑफर देऊन तुम्हीची फसवणूक केली जाऊ शकते. कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरून वस्तू स्वस्तात खरेदी करण्याचा मोह कोणालाही थांबवता येत नाही. पण ऑनलाईन शॉपिंग करताना ४ चुका करणे टाळले पाहीजे.

ऑनलाईन शॉपिंग करताना चुकूनही या 4 चुका करू नका

तुम्हीही ऑनलाईन शॉपिंग करताना कोणतेही कुपन असेल तर शक्यतो ते कुपन घेण्याचे टाळावे. कारण बनावट वेबसाइटवरून तुम्हाला अशी बनावट कुपन देऊन तुमची फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला हजारोंचा गंडा घातला जाऊ शकतो.

तुमच्या स्मार्टफोनवर दररोज अनेक ऑनलाईन शॉपिंग वरील ऑफर्स आणि त्याची लिंक येत असेल. पण तुम्ही अशा लिंकवर क्लिक न करता त्याकडे दुर्लक्ष करा. जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

स्वस्तात कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा मोह जरा आवरा. कारण बनावट वेबसाइटवर अनेक प्रकारच्या ऑफर देऊन ग्राहकांकडून पैशांची फसवणूक केली जाते. तुमची वैयक्तिक माहिती विचारून तुमचीही फसवणूक केली जाऊ शकते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्ही पेमेंट करता तेव्हा खूप काळजी घ्या. तुमचा डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर, CVV नंबर आणि पिन नंबर किंवा इतर बँक तपशील अॅप किंवा वेबसाइटची चांगली माहिती मिळाल्यानंतरच टाका. ऑनलाइन पेमेंट करण्याऐवजी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडणे चांगले.