Pension Amount Increased : खुशखबर! पेन्शनची रक्कम दुप्पट, जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pension Amount Increased : गेल्या काही दिवसांपासून देशात जुन्या पेन्शनची मागणी जोर धरत आहेत. अनेक राज्यातील सरकारांनी जुनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर आता उर्वरित राज्यातील कर्मचारी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत.

पण आता पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सरकारकडून पेन्शनची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना आता वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे. याचा फायदा लाखो पेन्शनधारकांना होणार आहे.

राजस्थान सरकारने सामाजिक सुरक्षा अंतर्गत मासिक पेन्शनमध्ये वाढ केली आहे. राजस्थानमधील निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारने मानवतावादी दृष्टिकोन ठेवून सामाजिक सुरक्षा अंतर्गत मासिक पेन्शनमध्ये वाढ केली आहे.

सामाजिक सुरक्षा अंतर्गत मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. सध्या दरमहा ५००-७५० रुपये दराने मिळणारी पेन्शन आता किमान १,००० रुपये प्रति महिना मिळणार आहे.

सीएम गेहलोत यांच्या मान्यतेने पेन्शनधारकांना आर्थिक मदत मिळणार आहे. वृद्ध, एकल महिला, अपंग, लहान आणि सीमांत शेतकरी पेन्शनसाठी पात्र अर्जदारांना मे महिन्यापासून वाढीव पेन्शनची रक्कम मिळेल, जी 1 जून 2023 रोजी पासून वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे. .

सरकारवर बोजा वाढेल

सरकारकडून पेन्शन वाढीचा निर्णय घेतल्याने सरकारवरील आर्थिक बोजा वाढणार आहे. पेन्शनची रक्कम दुप्पट केल्याने सरकारवर दरमहा 185 कोटी रुपये बोजा पडणार आहे. तसेच दरवर्षी सरकारवर 2222.70 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता पेन्शनधारकांना दरमहा १००० रुपये पेन्शन मिळणार आहे.

जुन्या पेन्शनची मागणी

देशभरातील अनेक बिगर भाजप राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. या राज्यांमध्ये सरकारकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही. तसेच जुनी पेन्शन लागू करण्यासाठी कर्मचारी संप करत आहेत.