Richest State In India:- भारत हा वेगाने विकसित होणारा देश असून येथे जगातील अनेक श्रीमंत कुटुंबांचे वास्तव्य आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार भारतात 94 नवीन अब्जाधीश उदयास आले आहेत.विशेष म्हणजे देशातील एकूण 80 टक्के श्रीमंत व्यक्ती एका विशिष्ट राज्यात राहतात. हे राज्य म्हणजे भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. उर्वरित श्रीमंत व्यक्ती ज्या राज्यात राहतात ते दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याचे नाव ऐकून तुम्ही निश्चितच आश्चर्यचकित व्हाल.
महाराष्ट्र सर्वाधिक श्रीमंत राज्य

महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत असलेले राज्य आहे. येथे देशातील सर्वाधिक अब्जाधीश राहतात. महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला ‘आर्थिक राजधानी’ म्हणून ओळखले जाते. जगभरात मुंबईचा उल्लेख श्रीमंत उद्योगपती आणि मोठ्या व्यवसायांसाठी केला जातो.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे मुंबईत राहतात. महाराष्ट्रात एकूण 386 अब्जाधीश कुटुंबे राहतात.ज्यामुळे हे राज्य श्रीमंतांच्या संख्येत अग्रेसर आहे. विशेष म्हणजे मुंबईने अब्जाधीशांच्या निवासस्थानाच्या बाबतीत चीनची राजधानी बीजिंगलाही मागे टाकले आहे.
मुंबईत राहतात 92 करोडपती
मुंबई शहरात तब्बल 92 करोडपती राहतात. यामध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या 27 मजली अँटिलिया निवासस्थानाचा समावेश आहे. तसेच ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निवासस्थान, ब्रिक उत्पादक रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया यांच्यासारखे दिग्गज उद्योगपती देखील येथेच राहतात.
भारतातील दुसरे श्रीमंत राज्य दिल्ली
महाराष्ट्राच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे. देशातील 217 श्रीमंत व्यक्ती दिल्लीमध्ये राहतात. दिल्लीतील उच्चभ्रू परिसर, उत्तम पायाभूत सुविधा आणि देशाच्या प्रशासकीय केंद्रामुळे या शहराला श्रीमंतांचा मोठा आधार मिळतो. त्यामुळे महाराष्ट्रासह दिल्ली हे देखील श्रीमंतांच्या संख्येमुळे चर्चेत असलेले राज्य आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्यातील ही टक्कर भविष्यात अधिक रोमांचक होऊ शकते.