Rolls-Royce Electric Car : Rolls-Royce ने लॉन्च केली ४ सेकंदात 250 किमी स्पीड पकडणारी जबरदस्त इलेक्ट्रिक कार, पहा किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rolls-Royce Electric Car : जगभरात आता अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही कंपन्यांनी आता पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. आता रोल्स-रॉयसने देखील पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे.

रोल्स-रॉयसने शायनींग या लॉन्च केलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. रोल्स-रॉयसने आज म्हणजेच १८ एप्रिल रोजी चीनमध्ये पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. या कारमध्ये कंपनीकडून बॅटरीबॅकअप देखील जबरदस्त देण्यात आला आहे.

रोल्स-रॉयस इलेक्ट्रिक कार ५८५ किमीची रेंज देते

Rolls-Royce ने शांघाय ऑटो शोमध्ये पहिल्या इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले आहे. Rolls-Royce कडून ही इलेक्ट्रिक कार ऑक्टोबर 2022 मध्ये लॉन्च केली जाणार होती. मात्र आता कंपनीकडून ही कार लॉन्च करण्यात आली आहे.

या कारमध्ये 430 kW मोटर बसवण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक मोटर 900 Nm टॉर्क निर्माण करते. तसेच ही कार स्पीडच्या बाबतीत देखील सर्वात वेगवान ठरत आहे. कारण ही इलेक्ट्रिक फक्त 4.5 सेकंदात 250 किमी/ताशी वेग पकडत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

तसेच या इलेक्ट्रिक कारमध्ये 102 kWh क्षमतेची बॅटरी बसवण्यात आली आहे. जर ही बॅटरी फुल चार्ज केल्यानंतर Rolls-Royce ची इलेक्ट्रिक कार 585 किमीची रेंज देते असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

किंमत

Rolls-Royce च्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची चीनमधील किंमत 5.75 दशलक्ष युआन ठेवण्यात आली आहे. म्हणजेच जवळपास 8.3 दशलक्ष डॉलर इतकी आहे. कंपनीकडून २०२३ मधील या महिन्यात कारचे वितरण सुरु करण्यात येईल.

या कारचे डिझाईन देखील जबरदस्त बनवण्यात आले आहे. या कारमध्ये पार्थेनॉन स्ट्रेट वॉटरफॉल ग्रिल, स्लिप-बॅक शेप आणि डबल-डोअर डिझाइन देण्यात आले आहे. त्यामुळे या इलेक्ट्रिक कारला स्पोर्टी लूक मिळत आहे.

तसेच कारमध्ये पार्किंगसाठी इंटिग्रेटेड टर्न सिग्नल आणि ब्रेक लाईटसह स्प्लिट टेललाइट देण्यात आली आहे. तसेच या कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये सर्वाधिक रेंज देत असल्याने ग्राहकांना देखील चांगलीच पसंत येईल असा कंपनीने दावा केला आहे.