Tata Punch EV : टाटा पंच EV ची पहिली झलक समोर! सिंगल चार्जमध्ये धावणार 320 किमी, मिळणार आधुनिक वैशिष्ट्ये, किंमतही कमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Punch EV : टाटा मोटर्सच्या अनेक कार सध्या ऑटो मार्केटमध्ये अधिक लोकप्रिय झाल्या आहेत. टाटा मोटर्सकडून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये कार लॉन्च केल्या जात आहेत. आता टाटा मोटर्सकडून लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आणखी एक कार लॉन्च केली जाणार आहे.

टाटा मोटर्सची लोकप्रिय कार Tata Punch आता लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पदार्पण करणार आहे. त्याची पहिली झलक समोर आली आहे. त्यामुळे टाटा मोटर्सच्या कार प्रेमींना आणखी एक इलेक्ट्रिक कार मिळणार आहे.

सध्या टाटा मोटर्सकडून टाटा पंच ही कार पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्येच उपलब्ध आहे. मात्र आता ग्राहकांना लवकरच Tata Punch इलेक्ट्रिक रूपात पाहायला मिळू शकते.

टाटा पंच ईव्हीचे डिझाइन

टाटा मोटर्सकडून Tata Punch EV चाचणी करताना दिसून आले आहे. या इलेक्ट्रिक कारचा लूक आणि डिझाईन त्याच्या पेट्रोल-डिझेल व्हेरियंटसारखेच आहे. EV SUV कार ALFA प्लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि ICE सेट-अप वरून इलेक्ट्रिक लेआउटमध्ये रूपांतरित होण्यासाठी ती फारशी अपग्रेड केलेली नाही.

टाटा पंच ईव्ही इंटिरियर

टाटा मोटर्सकडून अद्याप या कारचे कोणतेही डिझाईन समोर आणले गेले नाही. पण टाटा पंच EV चे फक्त एक इंटीरियर डिझाईन समोर आले आहे. कारमध्ये ICE आवृत्ती प्रमाणेच 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिसत आहे.

पण आगामी काळात त्याचा आकार 10.25 इंचांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. याशिवाय यामध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ड्राईव्ह सिलेक्टरही दिले जाऊ शकतात.

टाटा पंच ईव्ही पॉवरट्रेन

टाटा पंच EV मध्ये Ziptron पॉवरट्रेन दिली जाऊ शकते आणि यासह त्याला लिक्विड कूल्ड बॅटरीसह चुंबक सिंक्रोनस मोटर मिळेल. या बॅटरी पॅकची ड्रायव्हिंग रेंज 300 किमी पेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे ग्राहक सिंगल चार्जमध्ये ३०० किमीपर्यंत आरामात प्रवास करू शकतात.

टाटा पंच ईव्ही कधी लॉन्च होईल?

टाटा मोटर्सकडून टाटा पंच इलेक्ट्रिक कार ऑक्टोबरमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. टाटा पंच ईव्हीचे उत्पादन या वर्षी जूनपर्यंत सुरू होऊ शकते. या कारची किंमत 9.5 लाख ते 10.5 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली जाऊ शकते.