Diabetes : मधुमेहावर रामबाण उपाय! या पानांचा रस प्यायल्याने रक्तातील साखर राहील नियंत्रणात, पोटही होईल साफ…

तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर कोरफड त्यावर रामबाण उपाय ठरत आहे. कारण कोरफड रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.

Diabetes : आजकाल अनेकांना कमी वयात मधुमेह आणि कॅन्सर सारखे गंभीर आजार होत आहेत. चुकीची जीवनशाली आणि चुकीचा आहार या गंभीर आजारांना कारणीभूत ठरत आहेत. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी सतत काळजीपूर्वक आहार घेतला पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मधुमेह असणाऱ्या रुग्णांना सतत आरोग्याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी वाढून आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे आरोग्य तज्ञांच्या सल्ल्याने आहारामध्ये योग्य त्या गोष्टी घ्याव्यात.

अनेकवेळा तज्ञांकडून कोरफड रस पिण्याचा सल्ला देत असतात. कोरफड ही शरीरासाठी फायदेशीर मानली जाते. याचा उपयोग तुम्ही केस आणि आरोग्यासाठी करू शकता.

Advertisement

घरात असलेल्या एका कुंडीमध्ये एक छोटेसे रोपटे वाढवू शकता. या रोपाच्या पानातील गर काढून त्याचा तुम्ही रस करू शकता. हा रस केसांना लावू शकता किंवा तो पिऊही शकता.

कोरफडीचा रस कसा तयार करायचा

प्रथम कोरफडीच्या झाडाची पाने कापून घ्या ती वरून स्वच्छ धुवून घ्या. त्यावर बसलेली सगळी धूळ पाण्यानी धुतल्याने निघाहून जाईल. पानाच्या आतील गर काढा आणि तो बारीक करून घ्या. त्यात काळे मीठ, लिंबू आणि काळी मिरी मिसळून सर्वोत्तम रस तयार करा आणि प्या.

Advertisement

मधुमेहासाठी फायदेशीर

मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी कोरफड अत्यंत फायदेशीर मानली जात आहे. मधुमेह असणारे रुग्ण कोरफडीचा ज्यूस पिऊ शकतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने याचे सेवन करा.

हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले

Advertisement

कोरफडीचा रस हा हृदयासाठी फायदेशीर मानला जातो. कोरफडीच्या रसाचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या घातक आजारापासून बचाव करतात.

पोट साफ

मधुमेही रुग्णांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पचनक्रिया व्यवस्थित राहणे आवश्यक आहे, कोरफडीचा रस नियमित सेवन केल्यास बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, अपचन यासारख्या समस्या दूर होतात.

Advertisement

शरीर डिटॉक्स होईल

शरीरातील विषारी पदार्थ अनेक रोगांचे कारण बनू शकतात, म्हणून विषारी पदार्थ काढून टाकणे आवश्यक आहे, यामुळे शरीराची अंतर्गत स्वच्छता होईल. यासाठी तुम्हाला फक्त एक ग्लास कोरफडीचा रस रोज प्यायचा आहे.

Advertisement