Toyota Upcoming Cars : टोयोटाच्या दोन कारची बाजारात होणार ग्रँड एंट्री, मारुतीच्या या दोन कारवर आधारित असणार मॉडेल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Toyota Upcoming Cars : जपानी वाहन निर्माता कंपनी टोयोटा लवकरच दोन नवीन कार लॉन्च करणार आहे. अलीकडेच कंपनीने इनोव्हा हायक्रॉस एमपीव्ही कार लॉन्च केली आहे. मॅन्युअल गिअरबॉक्ससह इनोव्हा क्रिस्टल पुन्हा लॉन्च करण्याची योजना कंपनीने आखली आहे.

टोयोटा कंपनीकडून मारुतीच्या कारवर दोन मॉडेल लॉन्च करणार आहे. एक कार फ्रॉन्क्सवर आधारित असेल तर दुसरी कार एर्टिगावर आधारित असणार आहे. यामध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात येणार आहेत.

टोयोटा नवीन एसयूव्ही कूप लॉन्च करणार आहे, जी नुकत्याच सादर केलेल्या मारुती सुझुकी फ्रॉन्क्सवर आधारित असणार आहे. डिझाईनच्या बाबतीत कंपनीकडून बरेच बदल केली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ते फ्रॉन्क्सपेक्षा वेगळे स्वरूप देईल.

यारिस क्रॉसचे डिझाईन घटक या कूप एसयूव्हीमध्ये दिसू शकतात. पुढची रचना अर्बन क्रूझर हायराइडरसारखी असू शकते तर मागील बाजूस यारिस क्रॉससारखी रचना असू शकते.

या कार दोन इंजिन पर्याय 1.0L, 3-सिलेंडर बूस्टरजेट टर्बो पेट्रोल आणि 1.2L ड्युअलजेट पेट्रोलसह ऑफर केल्या जातील. सुझुकीचे सौम्य हायब्रीड तंत्रज्ञान दोन्हीमध्ये आढळू शकते.

टर्बो इंजिन 100bhp आणि 147.6Nm उत्पादन करण्यास सक्षम आहे तर ड्युअलजेट युनिट 90bhp आणि 113Nm उत्पादन करण्यास सक्षम आहे. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आणि AMT देऊ शकतात.

टोयोटा एक नवीन 3-रो MPV कार देखील लॉन्च करणार आहे. जी Ertiga MPV वर आधारित असेल. भारतात विशिष्ट मॉडेलमध्ये मोठे डिझाइन बदल आणि अद्ययावत केबिन मिळू शकते. कंपनी पूर्णपणे रीडिझाइन केलेला फ्रंट आणि रिवाइज्ड रियर देऊ शकते. इनोव्हा हायक्रॉसचे स्टाइलिंग घटक त्यात आढळू शकतात.