Toll tax hike, 1st April 2023 : देशभरात १ एप्रिलपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. नवीन आर्थिक वर्षात देशातील नागरिकांना सरकारकडून मोठा झटका दिला जाणार आहे. सरकारकडून आता पुन्हा एकदा टोल टॅक्स वाढवला जाणार आहे.
१ एप्रिलपासून सरकारकडून टोल टॅक्सच्या किमतीमध्ये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना हा मोठा झटका मानला जात आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रवास महागणार आहे. एप्रिल महिन्यात सर्वसामान्यांना चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे.
देशातील मोजक्या राज्यांमध्ये टोल वाढवण्यात आला आहे. १ एप्रिलपासून यूपी, पंजाब, राजस्थानसह इतर राज्यांमध्ये टोल टॅक्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या महार्गावर प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढवू शकते, ज्यामुळे राष्ट्रीय महामार्ग (NHs) आणि द्रुतगती मार्गांवरून प्रवास करणार्यांच्या खिशावर जास्तीचा आर्थिक बोजा पडणार आहे. माहितीनुसार, टोलच्या किमती 5% ते 10% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
टोल टॅक्समधील ही दरवाढ राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 नुसार केली जाईल. नवीन शुल्क दर १ एप्रिलपासून लागू केले जातील. त्यामुळे आता यूपी, पंजाब, राजस्थान मधील नागरिकांना महार्गावरून प्रवास करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
छोट्या वाहनांवर किती कर लागणार?
१ एप्रिलपासून टोल टॅक्सचे सुधारित दर लागू केले जातील. कार आणि हलक्या वाहनांसाठी टोल टॅक्स दरामध्ये 5% वाढ अपेक्षित आहे. इतर अवजड वाहनांसाठी टोल टॅक्स दरामध्ये 10% वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेसाठी देखील टोलचे दर वाढण्याची शक्यता आहे.
सध्या द्रुतगती मार्गावरून दररोज सुमारे 20 हजार वाहने ये-जा करतात. पुढील सहा महिन्यांत हा आकडा 50,000 ते 60,000 पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे आणि दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेसाठी टोल दर वाढण्याची अपेक्षा आहे.
मासिक लोकल पासमध्येही होणार वाढ
टोल प्लाझाच्या आसपास २० किलोमीटरपर्यंत राहणाऱ्या व्यक्तींच्या मासिक लोकल पासमध्ये देखील 10% ने वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन टोल दरांसह, NHAI चा महसूल वाढवणे आणि रस्ते वापरकर्त्यांना चांगली देखभाल आणि ऑपरेशन सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे.
यूपी, राजस्थानमध्येही टोल वाढणार
उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग-9 काही वर्षांपूर्वीच सुरू झाला असून या महामार्गावर अनेकवेळा टोल वाढवण्यात आले आहेत. तसेच आताही या महामार्गावर टोल टॅक्स वाढण्याची शक्यता आहे. 31 मार्चच्या मध्यरात्री 12 पासून टोल टॅक्समध्ये वाढ होणार आहे.
त्याचबरोबर राजस्थानमधील राष्ट्रीय महामार्गावर 1 एप्रिलपासून जास्त टोल टॅक्स द्यावा लागणार आहे. NHAI राजस्थानमध्ये 95 पेक्षा जास्त टोल बुथ चालवते. यातील बहुतांश दर 31 मार्चच्या मध्यरात्री 12 पासून टोल बूथवर लागू केले जातील.