Vastu Tips : ही वनस्पती घरात ठेवताच होईल मोठा आर्थिक लाभ! घरामध्ये चुंबकासारखा आकर्षित होईल पैसा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vastu Tips : नवीन घराची वस्तू निर्मण करत असताना अनेकजण वास्तुशास्त्रानुसार बांधत असतात. तसेच वास्तुशास्त्रानुसार वस्तू बांधने अनेकदा शुभ मानले जाते. पण अनेकदा अनेकांच्या घरामध्ये पैशांचा खळखळाट असतो. पण अशी एक वनस्पती आहे जी घरामध्ये ठेवताच पैशांचा पाऊस पडेल.

प्रत्येकाला घरामध्ये सुख, शांती आणि पैसा हवा असतो. त्यासाठी सर्वजण मेहनत करत असतात. पण जर तुम्ही तुमच्या घरामध्ये छोटी वनस्पती ठेवली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थिती सुधारेल. या वनस्पतीचे नाव क्रॅसुला वनस्पती आहे. तसेच या वनस्पतीला जेड प्लांट असे देखील म्हणतात.

अनेक लोक या वनस्पतीला पैसे आकर्षित करणारी चुंबक वनस्पती म्हणून देखील ओळखतात. कारण ही वनस्पती घरामध्ये ठेवल्यानंतर पैसे येण्याची दाट शक्यता असते. वनस्पती दिसायला लहान आहे मात्र प्रभाव मोठा आहे.

उत्पन्न वाढेल

जर तुम्हाला तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ करायची असेल तर तुम्ही क्रॅसुला वनस्पती घरामध्ये ठेऊ शकता. या झाडाला गुड लक प्लांट आणि मोहिनी प्लांट असे देखील म्हंटले जाते. तुम्ही घरामध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी वनस्पती ठेवली तर तुम्ही नक्कीच उत्पन्नात वाढ करू शकता.

आर्थिक स्थिती सुधारेल

तुमच्या घरामध्ये सतत पैशांचा खळखळाट असेल तर तुम्ही ही वनस्पती घरामध्ये ठेऊन आर्थिक स्थिती सुधारू शकता. घरामध्ये ही वनस्पती ठेवत असताना प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ठेवावी. ‘

या ठिकाणी ही वनस्पती ठेवणे शुभ मानले जाते. जर तुम्हाला घराच्या या ठिकाणी ही वनस्पती ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही घराच्या मुख्य गेटवर देखील ही वनस्पती ठेऊ शकता. जर तुम्ही असे केल्यास तुमच्या घरातील आर्थिक स्थिती सुधारेल.

सकारात्मक ऊर्जा

क्रॅसुला ही वनस्पती घरामध्ये ठेवणे शुभ मानले जाते. कामाच्या ठिकाणी नैऋत्य दिशेला ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. काम करण्याची इच्छा वाढते तसेच कामामध्ये वृद्धी होते.

कोणत्या दिशेला ही वनस्पती ठेवावी

क्रॅसुला ही वनपस्ती घरामध्ये ठेवत असताना ती योग्य ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला योग्य दिशा माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही क्रॅसुला ही वनस्पती बाल्कनी मध्ये देखील ठेऊ शकता. त्यासाठी तुमच्या बाल्कनीची दिशा उत्तर किंवा पूर्वेकडेच असावी. ही वनस्पती कधीही दक्षिण दिशेला ठेऊ नये.