Mumbai Central Railway Bharti 2024 : मध्य मुंबई रेल्वेत नोकरीची संधी, ‘या’ तारखेला मुलाखतीचे आयोजन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Central Railway Bharti 2024 : मध्य रेल्वे विभागीय रुग्णालय, कल्याण अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे

मध्य रेल्वे विभागीय रुग्णालय, कल्याण अंतर्गत “अर्धवेळ दंत शल्यचिकित्सक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2024 असून, उमेदवारांनी देय तारखेला कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे.

वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता देखील गरजेची आहे, तरी मुलाखतीस जाण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा. ही भरती कल्याण येथे होत असून, तुम्ही वरि. डीपीओ कार्यालय, मध्य रेल्वे, कार्मिक शाखा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, दुसरा मजला, अॅनेक्स इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – ४०० ००१ या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहू शकता.

लक्षात घ्या मुलाखतीस जाताना आवश्यक कागपदपत्रे सोबत घेऊन जावीत. भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://cr.indianrailways.gov.in/ ला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे
-मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2024 अशी आहे.
-उमेद्वारांनीं दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.