NCL Pune Bharti 2024 : पुण्यातील NCL मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी, दरमहा मिळेल 31,000 पगार…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NCL Pune Bharti 2024 : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे.

वरील भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-II” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

येथे M. Sc. झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात होत आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 35 वर्ष इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.ncl-india.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 31,000/- रुपये इतका पगार मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

-ऑनलाईन अर्ज https://jobs.ncl.res.in/Default या लिंकद्वारे सादर करा.

-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना ncl-india.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

-या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.