Nav Sahyadri Charitable Trust Bharti : नव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट पुणे अंतर्गत सध्या रिक्त जागांच्या पदांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जर तुम्ही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर जाणून घ्या या भरतीबद्दल सविस्तर माहिती…
वरील भरती अंतर्गत “प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 22 मे 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी पदवीधर आणि पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
यासाठी मुलाखत काई. निर्मलाताई पिंगळे विधी महाविद्यालय, चाकण 94/1B, चक्रेश्वर नगर, चक्रेश्वर मंदिराजवळ, चाकण, ता:- खेड, जि. :- पुणे ४१० ५०१ या पत्त्यावर आयोजित करण्यात आली आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखत 22 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://navsahyadri.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखतीस येताना उमेदवारांनी अर्ज तसेच कागदपत्रे सोबत आणावीत.
-या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 22 मे 2024 आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.