Railway Recruitment 2022 : राज्यात 2422 रिक्त पदांसाठी रेल्वेत भरती ! 10 वी पास असेल तरी मिळेल नोकरी…

RRC Railway Recruitment, Sarkari Naukri 2022: Railway Recruitment Cell (RRC) सेंट्रल रिजनने ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण 2422 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

त्याअंतर्गत मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर क्लस्टरमध्ये उमेदवारांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये अर्ज, निवड आणि भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती तपासू शकतात आणि 16 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जासाठी वयोमर्यादा 15 वर्षे ते 24 वर्षे आहे, ज्यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठीही सूट देण्याची तरतूद आहे. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु.100/- आहे.

या भरतीद्वारे मध्य रेल्वेच्या मुंबई क्लस्टरमध्ये 1659 पदे, भुसावळ क्लस्टरमध्ये 418 पदे, पुणे क्लस्टरमध्ये 152 पदे, नागपूर क्लस्टरमध्ये 114 पदे आणि सोलापूर क्लस्टरमध्ये 79 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. ऑनलाइन अर्ज सबमिट करताना किंवा प्रिंट करताना काही समस्या असल्यास, उमेदवार सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 (रविवार आणि सुट्ट्या वगळता) 022-67453140 वर कॉल करू शकतात किंवा act.apprentice@rrccr.com वर ईमेल करू शकतात.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.rrccr.com/PDF-Files/Act_Appr_21-22/Act_Appr_2021-22.pdf