Kamgar Gharkul Yojana : महाराष्ट्रात लाखो लोक बांधकाम करून किंवा गवंडी काम करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असतात. राज्यात असे कित्येक बांधकाम कामगार आहेत ज्यांच्याकडे अजूनही हक्काचे घर नाही. अशा परिस्थितीत अशा घर नसलेल्या कामगारांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील संघटित कामगारांना म्हणजेच ज्यांनी स्वतःची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून केली आहे अशा कामगारांना लवकरच हक्काचे घरकुल मिळवून देण्यासाठी शासनाकडून एक विशेष घरकुल योजना राबवली जाणार आहे.

विशेष म्हणजे हीं योजना कामगार विभागाकडून राबवली जाणार असून संघटित बांधकाम कामगाराला घर बांधण्यासाठी तब्बल साडेचार लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. मित्रांनो याबाबत अधिक माहिती अशी की, घर नसलेल्या संघटित बांधकाम कामगाराला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

संघटित कामगारांना घर बांधण्यासाठी कामगार विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या घरकुल योजनेचा लाभ घेता येणार असून या अंतर्गत कामगारांना दोन लाख रुपये तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कामगारांना एकूण अडीच लाख रुपये अनुदान स्वरूपात दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी जागेची शोधा शोध शासन दरबारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. घरकुल योजना राबवण्यासाठी गायरान गावठाण तसेच एमआयडीसी मध्ये जागेची शोधाशोध केली जात आहे.

याबरोबरच राज्यातील संघटित कामगारांच्या हितासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कामगार भवन, कामगार विमा रुग्णालय आणि क्रीडा संकुल बांधले जाणार आहे. मित्रांनो याबाबत स्वतः कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी माहिती दिली आहे.

औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, औरंगाबाद विभागातील अधिकाऱ्यांची कामे बरी आहेत मात्र चांगली नाहीत. कामाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले असून तशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त औरंगाबादमध्ये कामगार विभागाचे प्रादेशिक कार्यालय स्थापन केले जाणार असल्याचे मंत्री महोदय यांनी सांगितले आहे.

केवळ एक रुपयात होणार बांधकाम कामगार नोंदणी

मित्रांनो संघटित बांधकाम कामगारांना कामगार विभागाकडून घरकुल योजना राबवली जाणार असल्याने बांधकाम कामगारांना संघटित बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. विशेष म्हणजे नोंदणी शुल्कात शासनाकडून कपात करण्यात आले आहे. आता बांधकाम कामगार नोंदणी केवळ एक रुपया शक्य झाली आहे.

खरं पाहता पूर्वी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी 25 रुपये एवढा शुल्क आकारला जात होता. मात्र आता यामध्ये 24 रुपयांची कपात करण्यात आली असून एक रुपये एवढा शुल्क आकारला जाणार आहे. साहजिकच यामुळे बांधकाम कामगारांना दिलासा मिळणार असून अधिकाअधिक बांधकाम कामगारांना संघटित बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करता येणार आहे.

घरकुल योजनेसाठी म्हाडा उतरणार रिंगणात

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, बांधकाम कामगारांच्या घरासाठी म्हाडा सारख्या संस्थेची मदत घेतली जाऊ शकते. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे एक महिना भरापूर्वी संघटित बांधकाम कामगार घरकुल योजना राबवण्यासाठी जागेची मागणी करण्यात आली आहे.

जेवढी जास्त जागा उपलब्ध होईल तेवढी जास्त कामगारांना घर बांधता येतील. अशी माहिती प्रश्नोत्तरे देताना राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली. निश्चितच महाराष्ट्र राज्यातील संघटित बांधकाम कामगारांसाठी घरकुल योजना राबवली जाणार असून त्यांना आता घरकुल योजनेसाठी साडेचार लाख रुपये मिळणार आहेत.