ब्रेकिंग ! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ सिंचन योजनेस 2226 कोटींची सुधारित मान्यता ; हजारो शेतकऱ्यांना होणार फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : शेतीसाठी पाणी हा एक अविभाज्य घटक आहे. या आधुनिकीकरणाच्या युगात शेतीजमिनीविना शेती शक्य झाली आहे मात्र पाण्याविना शेती करणं हे वर्तमानात देखील अशक्य आहे आणि भविष्यात देखील अशक्यचं राहणार आहे.

त्यामुळेच शासनाकडून नेहमीच वेगवेगळ्या सिंचन प्रकल्पासाठी प्रयत्न केले जातात. आता नुकतेच एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशाच एका सिंचन योजनेस 2226 कोटी रुपयांची तरतूद सरकारकडून करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा क्षेत्रातील कुऱ्हा-वडोदा-इस्लामपूर उपसा सिंचन योजनेस 2226 कोटी रुपयांची तृतीय सुधारित शासनमान्यता प्रदान झाली आहे.

हा उपसा सिंचन प्रकल्प तापी पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत येतो. हा उपसा सिंचन प्रकल्प जळगाव आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांसाठी अति महत्त्वाचा ठरतो. या उपसा सिंचनाच्या योजनेसाठी खासदार रक्षा खडसे यांनी उपमुख्यमंत्री तसेच जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

खासदार महोदय यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून या उपसा सिंचन प्रकल्पासाठी 2226 कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे. खासदार रक्षा खडसे यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या योजनेसाठी मागणी केली होती. त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस यांनी लवकरच या योजनेला मंजुरी मिळेल असं आश्वासन दिलं होतं.

विशेष म्हणजे अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग यांना तात्काळ याबाबत कारवाई करण्याचे आदेश निर्गमित केले होते. या उपसा सिंचन प्रकल्पामुळे जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत असते. या उपसा सिंचन योजनेमुळे जळगाव जिल्ह्यातील 8 हजार 331 हेक्टर आणि बुलढाणा जिल्ह्यातील १७५६७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत असते.

यामुळे या योजनेचा या दोन्ही जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. साहजिकच हजारो हेक्टरवरील क्षेत्र या योजनेमुळे लाभान्वित होणार असून हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.