अखेर तो सोनियाचा दिन उजाडला ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 375 कोटींची मदत वितरित ; या दिवशी उर्वरित 316 कोटी होणार जमा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी खरीप हंगामात पावसाचा लहरीपणा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. सुरुवातीला पावसाचं उशिरा आगमन, त्यानंतर अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती मग शेवटी परतीचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.

बळीराजा अक्षरशा मेटाकुटीला आला. या पावसाच्या लहरीपणामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली. मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद देखील झाली.

माय बाप शासनाने देखील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. नांदेड जिल्ह्यालाही मदत मिळाली. आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत वितरित होण्यास सुरवात झाली आहे. नांदेड जिल्हा सहकारी बँकेकडून संबंधित अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप केली जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार जिल्हा सहकारी बँकेला 691 कोटी 15 लाख एवढी निधी शासनाकडून प्राप्त झाली आहे. सदर निधी टप्प्याटप्प्याने संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. या अनुषंगाने आतापर्यंत 375 कोटी 50 लाख एवढी मदत संबंधितांच्या खात्यावर वर्ग झाली आहे.

यामुळे संबंधित बाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील पाच लाख 27 हजार 491 हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले. यामध्ये जिरायतीमधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मूग या पाच लाख २७ हजार १४१ हेक्टरवरील पिकांसह ३१४ हेक्टरवरील बागायती व ६६ हेक्टरवरिल फळपिकांचा समावेश होता.

या क्षेत्रावरील सर्व पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या क्षेत्रावरील सात लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता. अशा परिस्थितीत बाधित शेतकरी मदतीची केव्हापासून वाट पाहत होते. मात्र आता प्रत्यक्षात मदत वाटप सुरू झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की 21 सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे हेतू 717 कोटी 88 लाख 91 हजार इतका निधी प्राप्त झाला होता. यानंतर जिल्हा प्रशासनाकडून हा निधी संबंधित शेतकऱ्यांना वर्ग करणे हेतू जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमवेतच इतर बँकांकडे सुपूर्द करण्यात आला.

यापैकी आता जिल्हा बँकेकडून संबंधितांच्या खात्यावर निधीवर्ग करण्याची प्रोसेस सुरू झाली आहे. जिल्हा बँकेला मिळालेल्या सात लाख 26 हजार 612 शेतकऱ्यांसाठी 691 कोटी 15 लाखापैकी 375 कोटी 30 लाख 38 हजार रुपये इतका निधी दोन लाख 62 हजार 340 शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला आहे. दरम्यान जिल्हा बँकेकडून उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरच मदत मिळणार आहे.